New Gen Ford Mustang Global Debut: सर्वात लोकप्रिय कारपैकी एक असलेली फोर्ड मस्टँग (Ford Mustang) कदाचितच कोणाला माहित नसेल. ही जगातील सर्वात प्रतिष्ठित स्पोर्ट्स कारपैकी एक आहे. अमेरिकन कार निर्माता कंपनीने ही कार पहिल्यांदा 1964 मध्ये बाजारात आणली. आता 14 सप्टेंबर 2022 रोजी फोर्ड या सर्वात लोकप्रिय कारच्या सातव्या पिढीचे अनावरण करणार आहे. डेट्रॉईट ऑटो शोमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात ही कार जागतिक स्तरावर सादर करण्यात येणार आहे. नवीन पिढीच्या कारमध्ये इंजिन पर्यायांच्या रेंजसह बरेच मोठे बदल होण्याची अपेक्षा आहे.
डिझाईनच्या बाबतीत, फोर्ड या कारमध्ये त्याचे आयकॉनिक मस्क्युलर सिल्हूट कायम ठेवेल. पण त्याचबरोबर अनेक कॉस्मेटिक अपडेट्सही यात पाहायला मिळतील. नवीन पिढीच्या कारला 13.2-इंचाची मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट प्रणाली, नवीन अलॉय व्हील, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, नवीन बंपर, स्लिमर ऑल-एलईडी हेडलाइट्ससह त्याच्या आतील भागात बरेच बदल मिळण्याची अपेक्षा आहे.
ही स्पोर्ट्स कार संपूर्ण जगात सर्वाधिक विकली जाते
आतापर्यंत त्याच्या इंजिन आणि पॉवरट्रेनबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. मात्र अशी अपेक्षा आहे की, कंपनी 5.0-लिटर V8 इंजिन आणि 2.3-लिटर, चार-सिलेंडर, इकोबूस्ट इंजिन पर्याय या नवीन पिढीच्या Ford Mustang मध्ये देऊ शकते. कंपनी आपल्या इतर कारमध्येही हे इंजिने वापरते. या कारमध्ये ऑटोमॅटिकसह 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सचा पर्यायही दिला जाऊ शकतो. फोर्ड मोटरचे अध्यक्ष आणि सीईओ जिम फार्ले यांच्या मते, स्पोर्ट्स कार रेंजमध्ये फोर्ड मस्टॅंग ही जागतिक बाजारपेठेत सर्वाधिक विकली जाते. अनेक अडचणी असूनही कंपनी निर्यातीसाठी कार आणि इंजिन तयार करत होती. आता हा प्रवास संपुष्टात आला आहे. फोर्डने 2013 च्या मध्यात EcoSport सादर केली, ही देशातील पहिली कॉम्पॅक्ट SUV 4-मीटरपेक्षा लहान आहे. याला मोठा प्रतिसाद मिळाला आणि कंपनी भारतीय बाजारपेठेत चांगली पकड निर्माण केली होती.
दरम्यान, फोर्डने भारतात आपल्या कारचे उत्पादन बंद केले आहे. गेल्या एक दशकापासून सातत्याने तोट्यात असल्याने कंपनीने भारतातील व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला. फोर्डचे भारतात दोन प्लांट आहेत. जे साणंद आणि चेन्नई येथे आहेत. कंपनी साणंदमध्ये फिगो, फ्रीस्टाइल, अॅस्पायर सारख्या छोट्या कारचे उत्पादन करत असे तर इकोस्पोर्ट आणि एंडेव्हर चेन्नईतील प्लांटमध्ये तयार केले जात होते. अशातच ही कार कंपनी भारतात लॉन्च करणार का? याबाबत अद्याप कंपनीकडून कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI