MG Gloster 2022 Launched: नवीन MG Gloster भारतात लॉन्च करण्यात आली आहे. याची किंमत 31.99 लाख रुपये आहे. नवीन एमजी ग्लोस्टर नवीन स्टाइलिंग, सुरक्षा आणि आधुनिक तंत्रज्ञानासह आणण्यात आली आहे. ही तीन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात अली आहे. याच्या टॉप व्हेरियंटची किंमत 40.77 लाख रुपये आहे आणि ही SUV 6 आणि 7-सीटर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. 


2022 MG Gloster च्या बाह्य भागामध्ये काही सामान्य बदल करण्यात आले आहेत. याच्या डिझाईन अपडेटबद्दल बोलायचे झाले तर यात नवीन डिझाइन केलेले ड्युअल-स्पोक अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. तसेच या एसयूव्हीमध्ये नवीन रंगाचा पर्याय डीप गोल्डन रंगाचा पर्याय जोडण्यात आला आहे. याशिवाय ही ग्लोस्टर एसयूव्ही मेटल ब्लॅक, मेटल अॅश आणि वॉर्म व्हाईट कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.


याच्या इंटीरियरबद्दल बोलायचे झाले तर, यात 12.2-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट आहे. यात अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले आहे, तसेच याला व्हॉईस कमांड देण्यात आले आहे. यासोबतच 12 स्पीकर उच्च दर्जाची ऑडिओ सिस्टम देण्यात आली आहे. यात 75 कनेक्टेड कार फीचर्स आहेत. नवीन आय-स्मार्ट इंटेलिजेंट सिस्टम ग्राहकांना त्यांच्या वाहनावर लक्ष ठेवण्यास मदत करेल.


ग्लोस्टरला प्रगत VR प्रणाली देखील मिळते. I-Smart चे हे एक खास फीचर्स आहे. जे सनरूफ, AC, म्युसिक आणि नेव्हिगेशनसह 35 हून अधिक हिंग्लिश कमांड नियंत्रित करण्यासाठी 100 हून अधिक कमांडस सपोर्ट करते. कंपनीने ते 2 व्हील ड्राइव्ह आणि 4 व्हील ड्राइव्हसह 6 आणि 7-सीटर पर्यायांमध्ये उपलब्ध केले आहे.


इंजिन आणि फीचर्स 


यात 2.0-लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे 212 hp ची पॉवर जनरेट करते. यात 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. फीचर्स बद्दल बोलायचे झाल्यास, यात 7 टेरेन मोड, ड्युअल पॅनोरॅमिक इलेक्ट्रिक सनरूफ, 12-वे अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, ड्रायव्हर सीट मसाज आणि व्हेंटिलेशन फीचर आणि वायरलेस चार्जिंग आहे. यामध्ये दरवाजा उघडण्याची वॉर्निंग, मागील क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, लेन चेंज असिस्टसह 30 स्टॅंडर्ड सेफ्टी फीचर्सचा समावेश आहे. 


महत्वाच्या बातम्या : 



 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI