New MG Hector: MG Motor India ने देशात लॉन्च होण्याआधीच आपल्या आगामी 2022 Hector Facelift SUV चा टीझर रिलीज केला आहे. या कारमध्ये ग्राहकांना स्मार्ट टीव्हीचा आनंद ही घेता येणार आहे. कंपनी या एसयूव्हीमध्ये 14-इंचाची HD पोर्ट्रेट इन्फोटेनमेंट सिस्टम देणार आहे. इतकी मोठी टचस्क्रीन भारतात कोणत्याही कारमध्ये देण्यात आलेली नाही. नेक्स्ट-जनरेशन हेक्टरच्या इंटीरियरची कन्सेप्ट सिम्फनी ऑफ लक्झरीवर आधारित आहे. कंपनी आपली ही कार दिवाळीत भारतात लॉन्च करू शकते.


पहिल्यांदा MG Hector कार भारतात 2019 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. ही भारतातील पहिली कार होती, ज्यामध्ये  Gaana, Accuweather  इनबिल्ट अॅप्स देण्यात आले होते. कंपनीने भारताची पहिली इंटरनेट कार म्हणून याची ब्रॅण्डिंग केली. तसेच कंपनीने या कारमध्ये भारतीय बोलींनुसार अनेक भाषांमध्ये व्हॉईस कमांड फंक्शन्स देखील यात दिले आहे.


MG मोटर देशात MG Astor लाँच करून मिड-साईज सेगमेंटमध्ये ADAS लेव्हल-2 फीचर्स देणारी पहिली कंपनी बनली आहे. त्यामुळे आता नवीन हेक्टरला ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, अ‍ॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट अलर्ट, ऑटो पार्क असिस्ट यासारखे स्मार्ट आणि आधुनिक ड्रायव्हर असिस्ट सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे.


फेसलिफ्टेड एमजी हेक्टरला 1.5-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि 2.0-लीटर डिझेल इंजिन मिळणार आहे. पहिले इंजिन 143 PS चा पॉवर आउटपुट आणि 250 Nm चा पीक टॉर्क जनरेट करतो. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि CVT ट्रान्समिशन पर्यायासह उपलब्ध आहे. मॅन्युअल ट्रिम 48-व्होल्ट सौम्य-हायब्रिड तंत्रज्ञानासह उपलब्ध असेल. टर्बो डिझेल 170 PS पॉवर आणि 350 Nm टॉर्क जनरेट करतो. तसेच हे इंजिन 6-स्पीड एमटी ट्रान्समिशनमध्ये येते. नवीन Hector भारतीय बाजारपेठेत महिंद्रा XUV700, मारुती ग्रँड विटारा, टोयोटा हायडरसह Hyundai Creta शी स्पर्धा करेल. हेक्टर हे MG चे पहिले उत्पादन होते. जे लॉन्च झाल्यापासून खूप यशस्वी सिद्ध झाले आहे.


 


 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI