Mahindra 9 seater Bolero Neo Plus: युटिलिटी व्हेइकल्स बनवण्यात महिंद्रा कंपनीचा हात कोणीच धरु शकत नाही. आपला पोर्टफोलिया वाढवण्यासाठी मंहिद्रा सातत्यानं आपल्या नव्याकोऱ्या गाड्या अद्ययावत तंत्रज्ञानासह ग्राहकांसाठी बाजारात आणत असते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिंद्रा पुन्हा एकदा ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन आपली प्रसिद्ध Bolero SUV चं अपडेटेड वर्जन बाजारात लॉन्च करणार आहे. महिंद्राची  Bolero Neo Plus (+) लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन बोलेरो नियो कंपनी सप्टेंबर महिन्यात विक्रीसाठी लॉन्च करु शकते. ही SUV टियर-2 सिटीच्या ग्राहकांच्या सोयीचा विचार करुन कंपनी लॉन्च करणार आहे. 


TUV300 Plus चं फेसलिफ्टेड वर्जन असेल. नव्या बोलेरो निओ प्लसमध्ये ग्राहकांना आसन क्षमता आणि जागेची सुविधा मिळणार आहे. असं सांगितलं जात आहे की, कंपनी ही एसयूव्ही दोन सीट कॉन्फिगरेशनमध्ये देऊ शकते, ज्यामध्ये 7-सीटर आणि 9-सीटर पर्याय उपलब्ध असतील. जे लोक कमी खर्चात चांगली जागा आणि जास्त जागा असलेली कार घेण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी महिंद्राची नवीकोरी  Bolero Neo Plus एक चांगला पर्याय ठरेल.


महिंद्रा 2019 पासून या एसयूव्हीची टेस्टिंग करत होती आणि आता कंपनी लवकरच ती बाजारात सादर करणार आहे. बोलेरो लाइन-अपमधील हे तिसरं मॉडेल असेल. यापूर्वी बोलेरो आणि बोलेरो निओ बाजारात आल्या होत्या. कंपनी नवी बोलेरो एकूण 7 व्हेरियंट्समध्ये लॉन्च करु शकते. ज्यामध्ये अॅम्ब्युलन्स व्हर्जनदेखील समाविष्ट असेल. बोलेरो ही कंपनीची सर्वात जास्त विकली जाणारी SUV आहे. कंपनी दर महिन्याला 7 ते 8 हजार युनिट्सची विक्री करते. महिंद्रा बोलेरोला शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांत मोठी मागणी आहे.  


पॉवर आणि परफॉर्मन्स


नवी बोलेरो निओ प्लस मध्ये, कंपनी 2.2 लीटर डिझेल इंजिन वापरेल, जे तुम्हाला स्कॉर्पिओ-एन मध्ये मिळतं तेच इंजिन आहे. पण त्याचं पॉवर आउटपुट थोडं कमी असेल. सूत्रांच्या हवाल्यानं, मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, हे इंजिन 120Hp पॉवर जनरेट करेल. हेच इंजिन स्कॉर्पिओ-एन मध्ये 130Hp पॉवर जनरेट करते. कदाचित कंपनी दोन मॉडेल्समध्ये फरक करण्यासाठी हे करत असेल. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलं जाऊ शकतं. 


किंमत काय?


Mahindra Bolero Neo Plus कंपनी महिंद्रा बोलेरो निओ प्लसमध्ये अनेक मोठे बदल करणार आहे. नवीन अत्याधुनिक फिचर्सना नव्या बोलेरोमध्ये स्थान दिलं जाऊ शकतं. नवीन अपडेटनंतर नव्या मॉडेलची किंमत थोडी वाढू शकते. सध्याच्या बोलेरो निओची किंमत 9.63 लाख ते 12.14 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. बोलेरो निओ प्लसच्या किंमतीबद्दल आताच काही माहिती समोर आलेली नाही, तरी असा अंदाज वर्तवला जात आहे की, नव्या बोलेरोची किंमत सध्याच्या मॉडेलपेक्षा किंचित जास्त असू शकते. 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI