Gul Panag Buys Mahindra Electric Auto Rickshaw: गुल पनाग (Gul Panag) ही काही बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे जिला कार आणि बाईक्सची खूप आवड आहे. तिला रोड ट्रिपिंग आवडते आणि ती अनेकदा बाईक चालवताना दिसली आहे. गुल पनाग (Gul Panag) ही फिल्म इंडस्ट्रीतील एकमेव सेलिब्रिटी आहे जिच्याकडे महिंद्रा स्कॉर्पिओ (Mahindra Scorpio Getaway)  गेटवे पिकअप एसयूव्ही आहे.


गुल पनाग देखील Green Energy ची समर्थक आहे. सनफ्युएल इलेक्ट्रिक या इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टार्टअपच्या सह-संस्थापक आहेत. त्यांनी अलीकडेच नवीन इलेक्ट्रिक ऑटो रिक्षाची डिलिव्हरी घेतली आहे. गुल पनागने (Gul Panag) महिंद्रा झोर ग्रँड इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर (Mahindra Scorpio Getaway) खरेदी केली आहे.


महिंद्रा इलेक्ट्रिकचे सीईओ सुमन मिश्रा यांनी गुल पनागचा नवीन इलेक्ट्रिक ऑटो रिक्षासोबतचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी हा फोटो शेअर करत लिहिले आहे की, "आमच्या लास्ट माईल कुटुंबात @GulPanag चे स्वागत आहे... तुम्ही आम्हाला ग्राहक म्हणून मिळाल्याबद्दल आम्हाला आनंद झाला आहे आणि तुम्ही या सायलेंट इलेक्ट्रिक वर्कहॉर्ससह काय साध्य करता ते पाहण्यास आम्ही उत्सुक आहोत."


पोस्टच्या खाली गुल पनागने तिचा इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर चालवतानाचा एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. ज्यात ती एका गावातील रस्त्यावर रिक्षा चालवताना दिसत आहे. प्रवासी वर्गाप्रमाणेच, इलेक्ट्रिक वाहनांनी व्यावसायिक वाहनांच्या क्षेत्रातही प्रवेश केला आहे. भारतीय बाजाराच्या व्यावसायिक क्षेत्रात अनेक इलेक्ट्रिक वाहन उत्पादक आहेत. ज्यामध्ये महिंद्र इलेक्ट्रिक हे मोठे नाव आहे.






महिंद्राच्या इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये झोर ग्रँड कार्गो इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर या वर्षी बाजारात आणली. झोर ग्रँड लॉन्च करून महिंद्रा इलेक्ट्रिकचे उद्दिष्ट देशातील शेवटच्या मैलाच्या वाहतूक क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याचे आहे. Mahindra Zor Grand ची किंमत 3.60 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. हे 10.24 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅकद्वारे समर्थित आहे. जे 12 kW इलेक्ट्रिक मोटरला पॉवर देते. ही इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा जास्तीत जास्त 50 Nm टॉर्क जनरेट करू शकते आणि कोणत्याही मोठ्या समस्येशिवाय उंच रस्त्यांवर चढू शकते.


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI