Vinoya Automatic Car Cover : कार खरेदी केल्यावर त्याची देखरेख करणे खूप महत्वाचे असते. अनेक लोक आपली कार कव्हरशिवाय कुठेही पार्क करतात. यामुळे बऱ्याचदा कारला स्क्रॅच येणे आणि करावर धूळ जमणे, असे प्रकार घडतात. तसेच बदलत्या ऋतूंचा देखील कारवार परिणाम होतो. पावसाळ्यात कव्हरशिवाय कार उघड्यात पार केल्यास कारच्या अनेक भागात पाणी जाऊ शकते. ज्यामुळे नंतर तुम्हाला त्रास सहन करावा लागू शकतो. तसेच हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात कारवार धूळ साचते. यामध्ये असे ही काही लोक आहेत, जे आपल्या कारवर कव्हर घालतात. मात्र दररोज कारवर कव्हर चढवणे आणि उतरवण्यास लागणारी मेहनत, तसेच वेळेमुळे ते वैतागतात. नंतर तेही आपल्या कारवर कव्हर चढवण्यास टाळाटाळ करतात. तुम्हीही याच त्रासाला कंटाळला असाल. तर आम्ही तुम्हाला बाजारात उपलब्ध असलेल्या एका अशा कव्हरबद्दल माहिती सांगणारो आहोत, जे फक्त 30 सेकंडतात तुमची संपूर्ण कार कव्हर करतो. तसेच फक्त एक बटन दाबल्यावर तुम्ही हे कव्हर लगेच गोळाकरून तुमच्या कारच्या डिकीत ठेवू शकता. 


विनोया (Vinoya) असं या ऑटोमॅटिक कार कव्हरचे नाव आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे कव्हर गंज-प्रतिरोधक 210T पॉलिस्टरपासून बनवण्यात आले आहे. या कव्हरमुळे तुमच्या कारला कोणतेही स्क्रॅच येणार नाही. हे ऑटोमॅटिक कार कव्हर फक्त 30 सेकंदांतात कार कव्हर करते. या कव्हरमध्ये सोलर बॅटरी देण्यात आली आहे. जी एकदा चार्ज केल्यावर 45 दिवस वापरता येते. यात विंडब्रेक दोरी देखील देण्यात आली आहे. ज्यामुळे कव्हर वाऱ्याने उडून जाण्याची शक्यात कमी होते.  






या ऑटोमॅटिक कारमध्ये एक खास फीचर देण्यात आले आहे. vinoya मध्ये एक anti-theft अलार्म फंक्शन देण्यात आले आहे. ज्यामुळे तुम्ही हे कव्हर कारवर चढवल्यावर रात्रीच्या वेळी देखील अंधार तुम्हाला तुमची कार पाहणं  शक्य होणार आहे. हे कार कव्हर वॉटरप्रूफ आहे. रिमोटने कंट्रोल होणारे हे कव्हर ऑफ बटण दाबल्यावर फक्त 10 सेकंदात आपोआप फोल्ड होतं. हे कव्हर जपानी क्राउडफंडिंग साइट ग्रीन फंडिंगवर लॉन्च करण्यात आलेले. चार वेगवेगळ्या आकारात हे कव्हर उपलब्ध आहे.                 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI