Tata EV Milestone: टाटा मोटर्स ही देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी आहे. टाटा मोटर्स देशात आपल्या सुरक्षित प्रवासी वाहनांसाठी ओळखली जाते. यासोबतच टाटाने व्यावसायिक वाहन क्षेत्रातही आपली चांगली पकड निर्माण केली आहे. देशभरात टाटाच्या ट्रकला मोठी मागणी आहे. यासोबतच कंपनीने इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रांतही आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. देशात सर्वाधिक इलेक्ट्रिक वाहन विक्रीत कंपनी आघाडीवर आहे. कंपनीची इलेक्ट्रिक कार नेक्सनला देशभरात मोठी मागणी आहे. यासोबतच अलीकडेच कंपनीने आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tiago लॉन्च केली आहे. अशातच कंपनीने देशात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. कंपनीने आपल्या 50 हजाराव्या कारची निर्मिती केली आहे. एक निवेदन प्रसिद्ध करून कंपनीने ही माहिती जाहीर केली आहे.    


कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनीने आपल्या पुण्यातील प्लांटमध्ये 50,000 वी ईव्ही बनवली आहे. कंपनीने आपल्या ठरवलेल्या लक्षाधीच ही कामगिरी केली आहे. या यशाने उत्साहित होऊन कंपनीने पुढील पाच वर्षांत 10 नवीन ईव्ही लॉन्च करण्याची योजना आखली आहे. Tata Motors च्या EV पोर्टफोलिओमध्ये Nexon EV ते Tata Tiago.ev चा समावेश आहे. Nexon EV ही देशातील सर्वात लोकप्रिय SUV आहे. तर Tata Tiago.ev ही देशातील पहिली इलेक्ट्रिक हॅचबॅक आहे.


कंपनीच्या या कामगिरी बाबत बोलताना टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेडचे ​​एमडी शैलेश चंद्र म्हणाले की, टाटा मोटर्सने देशात ईव्ही सेगमेंटचे प्रतिनिधित्व केलं असून कंपनी त्यात यशस्वी झाली आहे. इलेक्ट्रिक कार या इंधनाच्या वाढत्या किमती आणि प्रदूषण या समस्यांवर व्यावहारिक उपाय देत आहेत. ग्राहक आता ईव्हीचे स्वागत करण्यास तयार आहेत. आम्ही आमच्या ग्राहकांना परवडणारे वाहन देण्यासाठी टाटा समूहाच्या इतर कंपन्यांच्या मदतीने ईव्ही इकोसिस्टम तयार केली आहे. 


165 शहरांमध्ये विस्तार


ग्राहकांची गरज लक्षात घेऊन कंपनीने मल्टी मोड रेजेन (Multi Mode Regen) आणि मल्टी ड्राईव्ह मोड (Multi Drive Mode) सारखी फीचर्स सुरू केली आहेत. यासोबतच कंपनीने ग्राहकांना जागरूक करण्यासाठी एक कार्यक्रमही सुरू केला आहे. कंपनीची सर्व उत्पादने उच्च व्होल्टेज झिप्टट्रॉन आर्किटेक्चरद्वारे समर्थित आहेत. टाटा मोटर्सने 80 नवीन शहरांमध्ये आपल्या कार लॉन्च केल्या आहेत. अशा प्रकारे कंपनीने देशातील 165 हून अधिक शहरांमध्ये आपले नेटवर्क विस्तारले आहे. दरम्यान, देशात इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये (electric vehicle) झपाट्याने प्रगती होत आहे. अनेक नवीन वाहन उत्पादक (automakers ) कंपन्याही इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात पाऊल ठेवत आहेत. अधिक इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय उपलब्ध असल्याने ग्राहकही आता इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार करत असल्याचे चित्र आहे.    


Car loan Information:

Calculate Car Loan EMI