Upcoming Tata Cars: टाटा मोटर्स लवकरच आपली लोकप्रिय हॅचबॅक कार अल्ट्रोझ आणि मायक्रो एसयूव्ही पंच सीएनजी व्हर्जनमध्ये आणणार आहे. त्यानंतर या कार्स इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह लॉन्च केल्या जातील. कंपनीने यंदाच्या ऑटो एक्स्पोमध्ये या दोन्ही कारच्या CNG व्हर्जन्सचे प्रदर्शन केले. याच्या रिअर फ्लोअरवर एक नवीन ड्युअल सिलेंडर लेआउट सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये प्रत्येक सिलेंडरची क्षमता 30 लिटर आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ... 


Upcoming Tata Cars: कशी असेल पॉवरट्रेन?


कंपनीचे म्हणणे आहे की, या दोन्ही कारमध्ये फर्स्ट-इन-सेगमेंट लीकेज डिटेक्शन टेक्नॉलॉजी मिळेल, जी गॅस गळती झाल्यास आपोआप पेट्रोलवर स्विच करेल. या दोन्ही कारमध्ये फॅक्टरी फिटेड CNG किटसह 1.2L पेट्रोल इंजिन मिळेल, जे CNG वर 77PS कमाल पॉवर आणि 95Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. हे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सने सुसज्ज असेल.


Upcoming Tata Cars: फीचर्स 


या दोन्ही कारमध्ये नियमित पेट्रोल मॉडेलप्रमाणेच फीचर्स आहेत. ज्यात अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह 7-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, लेदरेट सीट अपहोल्स्ट्री, इलेक्ट्रिक सनरूफ, उंची- अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि प्रोजेक्टर हेडलॅम्प सारखे फीचर्स देण्यात येतील.


Upcoming Tata Cars: कधी होणार लॉन्च?


टाटा मोटर्स यावर्षी सणासुदीच्या हंगामात आपली पंच ईव्ही लॉन्च करू शकते. ही नवीन अल्फा प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल, जी टाटाच्या Ziptron पॉवरट्रेनसह देऊ केले जाऊ शकते. नवीन सिग्मा आर्किटेक्चरवर आधारित पंच EV त्याच्या ICE आवृत्तीपेक्षा हलकी आणि अधिक प्रशस्त असेल. Nexon EV मध्ये आढळल्याप्रमाणे या मिनी इलेक्ट्रिक SUV मध्ये दोन बॅटरी पॅक मिळू शकतात. या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये थोडे वेगळे बंपर आणि नवीन चाके दिसू शकतात. Tata Altroz ​​EV पुढील वर्षी लॉन्च होण्याची शक्यता आहे. याच्या डिझाइनमध्ये कंपनी थोडाफार बदल करू शकते.


Upcoming Tata Cars: कोणत्या कारशी होणार स्पर्धा?
 
टाटा पंच सीएनजी भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकी ब्रेझा सीएनजीशी स्पर्धा करेल, जी नुकतीच लॉन्च झाली आहे. तसेच टाटा अल्ट्रोझ सीएनजी मारुती सुझुकी बलेनो एस सीएनजीशी स्पर्धा करेल.


इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी: 


Honda Electric Scooters: होंडा आणणार दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, 2024 पर्यंत होणार लॉन्च; जाणून घ्या संपूर्ण माहिती


Car loan Information:

Calculate Car Loan EMI