New BMW X5 and X6 revealed: जर्मन लक्झरी कार निर्माता BMW ने त्यांचे दोन मॉडेल BMW X5 आणि X6 जागतिक स्तरावर ऑनलाइन सादर केले. कंपनी लवकरच याचे उत्पादनही सुरू करणार आहे. पण या कारला भारतीय बाजारात कधी प्रवेश मिळेल याबाबत कोणतीही माहिती अद्याप कंपनीने जाहीर केलेली नाही. भारतात या BMW कार मर्सिडीज बेंझ GLE, Audi Q7 आणि XC90 सारख्या कराल टक्कर देणार. या दोन नवीन कार कशा आहेत? यात कोणते खास फीचर्स देण्यात आले आहेत, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ...


New BMW X5 and X6 revealed: डिझाइन


New BMW X5 and X6 revealed: BMW च्या या दोन्ही लक्झरी कार्सना स्कल्पटेड बोनेट, मोठे किडनी ग्रिल, रुंद एअर व्हेंट्स, स्लीक एलईडी हेडलॅम्प्स देण्यात आले आहेत. कंपनीच्या दाव्यानुसार, या कारचे हेडलाइट पूर्वीपेक्षा 35 मिमी अरुंद करण्यात आले आहेत. तसेच X5 मॉडेलला पर्यायी अॅल्युमिनियम फ्रंट ग्रिल देखील मिळते. दुसरीकडे X6 मॉडेलला स्टँडर्ड एम स्पोर्ट पॅकेजसह स्टँडर्ड ऑक्टेन लोअर फेस मिळतो.


New BMW X5 and X6 revealed: रंग पर्याय


याच्या  मागील बाजूस रॅप-अराउंड टेल लॅम्प आणि क्वाड एक्झॉस्ट टिप्स दिसतात. रंग पर्यायांबद्दल बोलायचे झाल्यास, X5 मॉडेलला ब्रुकलिन ग्रे, आयल ऑफ मॅन ग्रीन आणि मरीना बे ब्लू कलर पर्याय मिळतात. तर X6 मॉडेलला ब्लू रिज माउंटन मेटॅलिक, ब्रुकलिन ग्रे मेटॅलिक, स्कायस्क्रॅपर ग्रे मेटॅलिक आणि फ्रोझन प्युअर ग्रे मेटॅलिक कलर पर्याय मिळतात.


New BMW X5 and X6 revealed: फीचर्स 


या आलिशान कारच्या केबिनमध्ये डॅशबोर्डच्या वर फिरणारा डिजिटल पॅनल देण्यात आला आहे. यासह नवीन 8.0 व्हर्जन BMW च्या iDrive ऑपरेटिंग सिस्टम (OS) मध्ये उपलब्ध आहे. याशिवाय 12.3-इंच इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले, 14.9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट डिस्प्ले, क्लाउड-आधारित BMW नकाशे नेव्हिगेशनसह लाइव्ह कॉकपिट प्लस सिस्टम या कारमध्ये मानक म्हणून उपलब्ध आहे.


New BMW X5 and X6 revealed: या करशी होणार स्पर्धा 


भारतातील BMW X5 आणि X6 या दोन्ही मॉडेल्सची भारतातील मर्सिडीज-बेंझ GLE (प्रारंभिक किंमत 87.91 लाख रुपये), Audi Q7 (प्रारंभिक किंमत 84.70 लाख रुपये) आणि Volvo XC90 (प्रारंभिक किंमत 96.50 लाख रुपये) यांच्याशी स्पर्धा होईल.


इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी: 


Bugatti Chiron Sport Car: बुगाटीने आपल्या शेवटच्या पेट्रोल कारचा केला लिलाव, तब्बल इतक्या कोटींना कार विकून केला विश्वविक्रम


Car loan Information:

Calculate Car Loan EMI