Bajaj Triumph Bike : देशातील ऑटो मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बजाज ऑटो (Bajaj Auto) आणि युनायटेड किंगडम (United Kindom) कंपनी ट्रायम्फने जागतिक स्तरावर दोन जबरदस्त बाइक्स Triumph's Speed 400 and Scrambler 400 X बाजारात येणार आहेत. येत्या 5 जुलैला या बाईक्स लॉंच केल्या जातील. या दोन कंपन्यांच्या पार्टनरशिपमध्ये बाजारात आणली जाणारी ही पहिली बाईक आहे. काय आहेत या बाईक्सचे फिचर्स , किंमत जाणून घेऊया.
दोन्ही बाईकमध्ये नवीन सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, ज्याला ट्रायम्फ टीआर-सीरीज इंजिन म्हटले जात आहे. हे 398cc DOHC आर्किटेक्चर लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 8000 rpm वर 40 hp पॉवर आणि 6500 rpm वर 37.5Nm टॉर्क जनरेट करेल. या गाड्यांचे इंजिन हे 6 गिअरबाॅक्सशी जोडले गेले आहे.
या नवीन ट्रायम्फ मोटरसायकलची फ्रेम ट्युब्युलर स्टीलपासून बनवण्यात आलेली आहे. दोन्ही बाईकमध्ये इंजिन सारखेच आहे, परंतु चेसिसमध्ये खूप फरक आहे. ट्रायम्फचा दावा आहे की दोन्ही बाईक या चेसिस आणि सस्पेंशन सेटअपसह तयार केल्या गेल्या आहेत. दोन्ही बाईकमध्ये समान सस्पेंशन वापरण्यात आले आहे. या माॅडेल्सना 43MM अपसाईड-डाउन फ्रंट आणि मागील बाजूस गॅस चार्ज केलेले मोनो शाॅक अॅब्जोबर्स देण्यात आले आहेत. सेफ्टीसाठी ड्युअल चॅनल ABS सह डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.
इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, बाईकमध्ये राइड-बाय-वायर, राइडिंग मोड, स्लिपर क्लच आणि अॅडजस्टेबल लीव्हर्स यांसारखी वैशिष्ट्ये मिळण्याची अपेक्षा आहे.या दोनही बाईक सध्या तीन वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध होणार आहेत.ज्यात लाल , निळा आणि काळा हे रंग प्रामुख्याने असणार आहेत.
trimph Speed 400 आणि Scrambler 400X येत्या 5 जुलै रोजी भारतात लॉन्च होतील आणि त्याच वेळी त्यांच्या किमती जाहीर केल्या जातील. प्रभावी वैशिष्ट्ये आणि वैशिष्ट्यांसह Triumph चे ब्रँड मूल्य लक्षात घेऊन, Speed 400 ची किंमत सुमारे 3 लाख रुपये असेल आणि Scrambler 400X ची किंमत थोडी जास्त असण्याची शक्यता आहे. या बाईकच्या रेट्रो लुकमुळे याते क्रेझ तरूणांंमध्ये मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. या बाइक्स रॉयल एनफिल्ड या सेगमेंटमधील गाड्यांसाठी स्पर्धा वाढवतील. Hero MotoCorp च्या सहकार्याने Harley-Davidson 5 जुलै 2023 रोजी X440 लाँच करण्याच्या तयारीत असल्याने भारतातील रेट्रो बाईक मार्केटमध्ये आणखीन स्पर्धा वाढू शकते.
इतर महत्वाच्या बातम्या
Car loan Information:
Calculate Car Loan EMI