Upcoming TVS Bike : देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक TVS लवकरच भारतीय बाजारपेठेत नवीन बाईक लॉन्च करणार आहे. स्पोर्ट सेगमेंटमधील TVS Zeppelin R ही नवीन क्रूझर बाईक असेल, जी लवकरच लॉन्च केली जाईल. Zeppelin R चे कॉन्सेप्ट मॉडेल 2018 ऑटो एक्सपोमध्ये शोकेस करण्यात आले होते. त्यानंतर ही बाईक लवकरच लॉन्च होईल, अशा बातम्या अनेकदा आल्या. कंपनी आपले इलेक्ट्रिक मॉडेल देखील आणेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, कंपनीने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. सध्या आपण आगामी बाईक Zeppelin R चे बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

Continues below advertisement

इंजिन सौम्य हायब्रीड तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल

काही अहवालांवर विश्वास ठेवला तर, कंपनी TVS Zeppelin R मध्ये 220cc सिंगल सिलेंडर पेट्रोल इंजिन देऊ शकते. हे इंजिन सौम्य हायब्रिड तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. या आगामी बाईकमध्ये तुम्हाला 48 व्होल्ट लिथियम आयन बॅटरी पाहायला मिळेल. याचे इंजिन 20bhp पॉवर आणि 18.5Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यात 5 स्पीड गिअरबॉक्स मिळेल. याच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, ही बाईक दिसायला खूपच जबरदस्त आहे. यात एलईडी हेडलॅम्प, स्प्लिट सीट, फ्लॅट ट्रॅक स्टाईल हँडलबार, 17-इंच फ्रंट आणि 15-इंच मागील चाक मिळेल.

Continues below advertisement

मिळू शकतात हे फीचर्स 

टीव्हीएसच्या या आगामी बाईकमध्ये कॉम्पॅक्ट इन्स्ट्रुमेंट कन्सोल, स्मार्ट बायो की, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, यूएसजी फ्रंट फोर्क्स आणि मोनोशॉक युनिट, फ्रंट आणि रिअर डिस्क ब्रेक्स यासह अनेक फीचर्स मिळू शकतात. याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, ही बाईक भारतीय बाजारपेठेत 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या टॅगसह सादर केली जाऊ शकते. दरम्यान, कंपनी आपली ही नवीन बाईक भारतात कधी लॉन्च करणार, याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

यामाहा घेऊन येत आहे नवीन Electric Scooter, OLA आणि Ather ला देणार टक्कर; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत


Car loan Information:

Calculate Car Loan EMI