BMW G 310 RR India launch: प्रीमियम बाईक उत्पादक BMW Motorrad India ने अधिकृतपणे BMW G310 RR, TVS Apache RR 310 वर आधारित सुपरस्पोर्ट बाईकचा टीझर लॉन्च केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी ही नवीन बाईक 15 जुलै 2022 रोजी लॉन्च करणार आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या टीझर फोटोमध्ये त्याची टेललाइट दिसत आहे.
ही बाईक थेट TVS Apache RR 310 शी स्पर्धा करणार आहे. TVS Apache RR 310 च्या BMW आवृत्तीवर गेल्या काही काळापासून काम सुरू आहे आणि आता BMW Motorrad द्वारे याची पुष्टी केली गेली आहे. TVS मोटर कंपनीने आपल्या होसूर, तमिळनाडूमध्ये BMW G310 R आणि G 310 G चे उत्पादन सुरू केले आहे. नवीन BMW G310 RR देखील या प्लांटमध्ये तयार केली जाईल.
TVS Apache RR 310 च्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये 313 cc इंजिन वापरले आहे. जे 9,700 rpm वर 34 bhp पॉवर आणि 7,700 rpm वर 27.3 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. हेच इंजिन BMW G310 RR मध्ये वापरले जाऊ शकते, असे बोलले जात आहे. याशिवाय Apache RR 310 मध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, राईड-बाय-वायर आणि चार राइडिंग मोड - अर्बन, ट्रॅक, स्पोर्ट आणि रेन यांसारखी फीचर्स देखील मिळतात.
टीझर इमेजमध्ये दिसत असल्याप्रमाणे यात टेललाइट, मिरर, विंडस्क्रीन इत्यादी भाग TVS Apache RR 310 सारखेच आहेत. पण BMW Motorrad लक्षात घेता, नवीन BMW G310 RR चे डिझाईन TVS Apache RR 310 पेक्षा बरेच वेगळे असणार आहे. एकदा लॉन्च झाल्यावर BMW G 310 RR ची टक्कर TVS Apache RR 310 आणि KTM RC 390 सोबत होईल.
इतर महत्वाच्या बातम्या:
Luxury Car: 1.2 कोटी रुपये किमतीची BMW X6 नदीत फेकली, कारण जाणून व्हाल थक्क
'या' 3 लक्झरी बाईक एप्रिल 2022 मध्ये झाल्या लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
PHOTO : i4 Electric Sedan : 590km ची हाय रेंज, जबरदस्त लूक; BMW ची नवी लक्झरी कार भारतात
Car loan Information:
Calculate Car Loan EMI