Luxury Bike: भारतात अनेक लोक हे लक्झरी बाईकचे शौकीन आहेत. अशातच जर तुम्ही नवीन लक्झरी बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला एप्रिल 2022 लॉन्च झालेल्या 3 लक्झरी बाईकबद्दल माहिती सांगणार आहोत. यात आपण या महागड्या बाईकच्या किंमती आणि फीचर्सबद्दल ही माहिती जाणून घेणार आहोत. 


BMW F 900 XR 


लक्झरी वाहन निर्माता BMW ने एप्रिलमध्ये आपली F 900 XR अपडेटेड बाईक भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे . ज्याची प्रारंभिक किंमत 12.3 लाख (एक्स-शोरूम) आहे. मात्र या बाईकची डिलिव्हरी जून 2022 पासून केली जाईल. BMW F 900 च्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर, ही लक्झरी बाईक अनेक आधुनिक फीचर्सने सुसज्ज आहे. यात मल्टी-फंक्शन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. जे स्मार्टफोनमध्ये अॅप इन्स्टॉल केलेले असले तरीही मोबाईल फोन आणि मीडिया फंक्शन्ससाठी वापरले जाऊ शकते.


2022 Honda Hawk 11 


दिग्गज ऑटोमेकर Honda ने आपली नवीन बाईक Honda Hawk 11 (2022 Honda Hawk 11) जपानी बाजारात लॉन्च केली आहे. जपानच्या टू-व्हीलर मार्केटमध्ये या जबरदस्त बाईकची विक्री सुरू झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ओसाका मोटर शोमध्ये ही बाईक प्रदर्शित करण्यात आली होती. याची प्रारंभिक किंमत 8.30 लाख रुपये आहे. 


2022 Ducati Multistrada V2 


प्रीमियम बाईक ब्रँड डुकाटीने एप्रिलमध्ये 14.65 लाख (एक्स-शोरूम) च्या प्रारंभिक किंमतीसह त्यांची नवीन रग्ड बाईक मल्टीस्ट्राडा V2 भारतात लॉन्च करण्याची घोषणा केली. तसेच याच्या दुसऱ्या व्हेरिएंट Multistrada V2 S ची किंमत 16.65 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. डुकाटीचा दावा आहे की, नवीन मल्टीस्ट्राडा V2 आरामदायक, उत्तम हँडलिंग अनुभव आणि अधिक प्रगत शक्तिशाली ट्विन-सिलेंडर इंजिनसह येईल. ही बाईक भारतातील अॅडव्हेंचर टूरर सेगमेंटमध्ये डुकाटीची ताकद आणखी वाढवेल.


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI