PHOTO : i4 Electric Sedan : 590km ची हाय रेंज, जबरदस्त लूक; BMW ची नवी लक्झरी कार भारतात
भारतात आणखी एक इलेक्ट्रिक कार आली आहे. ही कार आहे जर्मन लक्झरी कार-निर्माता BMW ची आहे. बीएमडब्लूने iX आणि मिनी इलेक्ट्रिक नंतर त्यांची तिसरी इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च केली आहे. BMW i4 ही इलेक्ट्रिक सेडान कार आहे आणि ती भारतातील अशाप्रकारची पहिलीच कार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही कार i4 3 Series वर आधारित आहे. पण यात स्पोर्टियर डिजाइन आणि स्टायलिंगसारखे अधिक कूप मिळतात, जे स्टँडर्ड 3 सीरिजशी तुलना केल्यास फार वेगळी दिसते.
i4 इलेक्ट्रिक सेडानला खास स्टायलिंग दिलेली आहे जी BMW श्रेणीतील 'i' उत्पादन किंवा EV म्हणून चिन्हांकित करते. यामध्ये, तुम्हाला फ्लश डोअर हँडल्स आणि समोरच्या बाजूला खास निळ्या रंगाचे अॅक्सेंट पाहू शकता. नवीन एरो स्पेशल व्हील असल्याने चाके देखील वेगळी आहेत जी कारची श्रेणी सुधारतात
आतील भागात लेटेस्ट iDrive इन्फोटेनमेंट प्रणाली आहे तर नवीन 12.3-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 14.9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. इतर वैशिष्ट्यांमध्ये कारमध्ये एक सनरुफ, तीन झोन हवामान नियंत्रण प्रणाली, सभोवतालची प्रकाश व्यवस्था, 17-स्पीकर हरमन कार्डन ऑडिओ सिस्टम आणि बरेच काही समाविष्ट आहे.
i4 इलेक्ट्रिक सेडानमध्ये सिंगल रीअर एक्सल मोटर आहे जी 340hp आणि 430Nm विकसित करते आणि तर गाडीचा सर्वाधिक वेग प्रतितास 190 किमीपर्यंत मर्यादित आहे.
ही i4 eDrive 40 आहे ज्यात 590km च्या प्रचंड रेंजचा दावा करण्यात आला आहे. EVs मधील ही आतापर्यंतची सर्वोच्च रेंज आहे आणि जलद DC चार्जर फक्त 31 मिनिटांत 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करु शकतो. i4 ची किंमत रु. 69.90 लाख आहे आणि यामुळे ती अनेक गाड्यांना टक्कर देऊ शकते. इतर लक्झरी ईव्हीच्या ही आतापर्यंतची सर्वात कार्यक्षम आणि परवडणारी आहे.