Hybrid Car: जपानी वाहन उत्पादक कंपनी होंडा लवकरच आपली नवीन Honda City Hybrid 2022 कार भारतात लॉन्च करणार आहे. ही एक मजबूत हायब्रीड कार आहे. कंपनी आपली ही कार 14 एप्रिल रोजी लॉन्च करू शकते. सिटी E: HEV म्हणून ओळखला जाणारा हा व्हर्जन आपल्या सेगमेंटमध्ये सर्वात वरच्या पायरीवर आहे. यात ग्राहकांना पेट्रोल इंजिनसह दोन इलेक्ट्रिक मोटर्स मिळणार आहे. यात एक इंजिन, एक इन्व्हर्टर, दोन इलेक्ट्रिक मोटर्स आणि एक लहान लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळेल.    


Honda City Hybrid 2022 ची मोठी मोटर 109PS जनरेट करेल. तर पेट्रोल इंजिन 98PS जनरेट करेल. या कारमध्ये तीन ड्राइव्ह मोड मिळतील. यात EV ड्राइव्ह, हायब्रिड ड्राइव्ह आणि इंजिन ड्राइव्हचा समावेश असेल. EV ड्राइव्ह म्हणजे ग्राहक याचे इंजिन चालू आणि बंद करून इलेक्ट्रिक पॉवर मोडवर चालू शकतात. इलेक्ट्रिक ड्राइव्हमध्ये तुम्ही स्विच चालू आणि बंद करून इलेक्ट्रिक पॉवरमोड ऑन करू शकता. 


या कारमध्ये एडाप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट, ADAS सारखे फीचर्स मिळू शकतात. असे फीचर्स असलेली ही एकमेव सेडान कार आहे. आत्तापर्यंत हे फीचर्स फक्त SUV मध्ये उपलब्ध होते. दरम्यान, या कारचे आणखी फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमतीबद्दल अधिक माहिती मिळू शकलेली नाही आहे. ही कार भारतात लॉन्च झाल्यानंतरच याबाबत अधिक माहिती मिळू शकेल.   


इतर महत्त्वाच्या बातम्या:



Car loan Information:

Calculate Car Loan EMI