Toyota Innova: जपानी वाहन उत्पदक कंपनी टोयोटाने आपली नवीन 'इनोव्हा क्रिस्टा इलेक्ट्रिक' (Toyota Innova Crysta Electric) इंडोनेशिया आंतरराष्ट्रीय मोटर शोमध्ये प्रदर्शित केली आहे. ही नवीन पिढीची इनोव्हा आहे. ही कार इनोव्हाच्या इलेक्ट्रिक व्हर्जन आणि इलेक्ट्रिक कन्व्हर्जन सारखी दिसते. कंपनीने इनोव्हा इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये बरेच नवीन बदल केले आहेत. आपल्या जुन्या मॉडेलपेक्षा ही कार दिसायला खूप वेगळी आहे. 


या कारच्या स्टँडर्ड मॉडेलप्रमाणे याच्या समोरील बाजूस लोखंडी ग्रील देण्यात आलेली नाही. त्याऐवजी निळ्या हायलाइट्स आणि नवीन एलईडी दिवे असलेली रंगीत EV ग्रिल आहे. याचे इंटीरियर देखील मानक इनोव्हा पेट्रोल/डिझेल प्रमाणेच आहे. याच्या डॅशबोर्डमधील टचस्क्रीनवर EV स्पेसिफिक रीडआउट आणि मध्यभागी एक लहान स्क्रीनसह एक अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. जाणकारांचे म्हणणे आहे की, ही कार फक्त एक कॉन्सेप्ट असून कंपनी ही कार बाजारात उतरवणार नाही. कारण कंपनी याच्या हायब्रीड मॉडेलवर काम करत आहे. 


या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये त्याच्या आकाराप्रमाणे एक मोठी बॅटरी दिली असावी. कारण ही एक एमपीव्ही कार असून या कार खास करून लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी डिझाईल केल्या जातात. यामुळे यात मोठ्या बॅटरी पॅकची आवश्यकता असेल. भारतात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढत आहे. अशातच कंपनी आपली ही कार भारतात लॉन्च करणार का, हे अद्याप कळू शकलेलं नाही.


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI