Toyota Camry Launch : टोयोटाने (Toyota)भारतात नवीन कॅमरी हायब्रिडचा (Toyota Camry Hybrid)फेसलिफ्टेड व्हर्जन लॉन्च केला आहे. कॅमरी हायब्रिड (Camry Hybrid) ही सध्याच्या काळात भारतात लॉन्च होणारी टोयोटाची पहिली सेडान कार आहे. ही भारतातल्या हायब्रिड सेडान गाड्यांमधलीच एक कार आहे. कॅमरी हायब्रिड हा खरंतर कॅमरीचा फेसलिफ्ट व्हर्जन आहे. यामध्ये डिझाईन (Design)आणि इंटिरीयरमध्ये (Interior)बदल करून इतर फीचर्स जोडले आहेत. जाणून घ्या या कारचे फीचर्स आणि बरंच काही....
कारच्या इंटिरीयरमध्ये नेमके काय बदलले?
या कारच्या आतल्या लूकचे फीचर्सतर कमालच आहेत. मात्र, कारच्या बाहेरच्या बाजूसही जास्त बदल न करता कारची ओळख कायम ठेवली आहे. बाहेरच्या बाजूस (Camry Hybrid Exterior) नवीन फ्रंट बंपर आणि एक नवीन ग्रिल जोडला गेला आहे. नवीन मॉडेलमध्ये 18 इंच अलॉय व्हील दिले गेले आहेत. तर बाहेरच्या लूकसाठी मेटल स्ट्रिम मेटॅलिक नावाचा नवीन कलर रेंजचा वापर केला आहे. हा नवीन कलर प्लॅटिनम व्हाईट पर्ल, सिल्व्हर मेटॅलिक, ग्रेफाईट मॅटेलिक, रेड मीका, एटिट्यूड ब्लॅक आणि बर्निंग ब्लॅक इत्यादी कलर्समध्ये उपलब्ध आहे.
फिचर्सच्या बाबतीत ही नवीन कॅमेरी हायब्रिड कार (New Camry Hybrid)अनेक पद्धतीने खास आहे. यामध्ये तुम्हाला 10 पद्धतीचे पॉवर एडजस्टेबल ड्रायव्हर सीट बरोबरच व्हेंटिलेटेड फ्रंट सीट,मेमरी फंक्शनसह ओआरव्हीएम आणि टिल्ट-टेलिस्कोपिक स्टेयरिंग कॉलम, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, थ्री-झोन क्लायमेट कंट्रोल सिस्टीम आणि अशा अन्य लग्जरी फीचर्ससह ही नवीन कार लॉन्च करण्यात आली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीनेसु्द्धा या कारमध्ये खबरदारी घेण्यात आली आहे. सुरक्षेसाठी कॅमरी हायब्रिड कारमध्ये (Hybrid Car)9 एसआरएस एयरबॅग, पार्किंग असिस्टेंट, हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल, ब्रेक होल्ड फंक्शनच्या बरोबर इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीमसारखी सुविधा देण्यात आली आहे.
कारच्या इंजिनविषयी जाणून घ्या
(Toyota Camry Hybrid engine)यामध्ये हायब्रिड पेट्रोल किंवा इलेक्ट्रिक पॉवरट्रेन आहे. हे इंजिन 2.5 लीटर, 4- सिलेंडर पेट्रोलसकट येते. या इंजिनमध्ये मोटर जनरेटर 218PS चे आऊटपुट दिले आहे. या कारमध्ये स्पोर्ट, इको आणि नॉर्मल असे तीन प्रकारचे ड्रायव्हिंग मोड आहेत. कॅमरी कारच्या हायब्रिड बॅटरीच्या बाबतीत म्हणायचे झाले तर ही बॅटरी 8 वर्ष किंवा 1,60,000 किलोमीटरच्या गॅरंटीसकट तुम्हाला मिळते. ही नवीन कॅमरी हायब्रिड कार अनेक सुविधांसह 41,70,000 रूपयांना बाजारात उपलब्ध आहे.
हे ही वाचा :
- Skoda Kodiaq : नऊ एअरबॅग्ज असलेली स्कोडाची नवी कार, पाहा किंमत आणि भन्नाट फिचर्स
- Amazon Deal : भन्नाट ऑफर! 75 हजारांचा Samsung स्मार्टफोन खरेदी करा फक्त 35 हजारांत
- इंटरनेट कनेक्शन शिवाय 'टॅप टू पे' द्वारे करा सुरक्षित पेमेंट, PayTm ची ग्राहकांसाठी नवी सुविधा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Car loan Information:
Calculate Car Loan EMI