Upcoming Cars : जर तुम्ही नवीन वर्षात कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडी वाट पाहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण भारतीय कार बाजारात लवकरच SUV, MPV आणि हॅचबॅक कार लॉन्च होणार आहेत. यामध्ये अनेक दमदार कार आहे. ज्या 10 लाखांच्या बजेटमध्ये तुम्ही खरेदी करू शकता. या अपकमिंग कारमध्ये कोणते फीचर्स मिळणार आहे आणि कोणत्या आहेत या कार हे जाणून घेऊ...

मारुती सुझुकी बलेनो क्रॉस (Maruti Suzuki Baleno Cross)
प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी लवकरच आपली बलेनो अपडेटेड स्वरूपात लॉन्च करणार आहे. ही SUV कार नुकतीच टेस्टिंगदरम्यान दिसली. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी ऑटो एक्सपो 2023 मध्ये ही कार लॉन्च करू शकते. कंपनी या कारमध्ये 1L बूस्टरजेट टर्बो-पेट्रोल इंजिनसह 5 स्पीड मॅन्युअल (MT) आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक (AMT) ट्रान्समिशनचा पर्याय देऊ शकते. या कारमध्ये कंपनीला अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, हेड अप डिस्प्ले, 360-डिग्री व्ह्यू कॅमेरा, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल (ACC), प्रीमियम साउंड सिस्टम मिळेल. याशिवाय यात सनरूफ आणि सिक्स एअरबॅग्ज सारखी फीचर्स मिळू शकतात. या कारची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही आहे. तसेच कंपनीने याच्या लॉन्चिंग बद्दल अद्याप अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.

स्कोडा फोबिया 2023 (skoda fabia 2023)

डिझाइनच्या बाबतीत ही हॅचबॅक कार खूपच प्रेक्षणीय आहे. कंपनी ही कार अपडेटेड फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह सादर करेल. मिळालेल्या माहितीनुसार, ही कार डिसेंबर 2022 मध्येच लॉन्च केली जाऊ शकते. ही कार दोन इंजिन पर्यायांसह लॉन्च केली जाऊ शकते. पहिले इंजिन 1.0L MPI पेट्रोल इंजिन आहे. जे 80 PS पॉवर आणि 93 Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते आणि दुसरे इंजिन 1.0L TSI पेट्रोल इंजिन आहे. जे 110 PS पॉवर आणि 200 Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. याशिवाय दोन्ही इंजिनसह 5 स्पीड मॅन्युअल (MT) आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक (AMT) ट्रान्समिशन दिले जाऊ शकते.

महिंद्रा इलेक्ट्रिक KUV100 (mahindra electric kuv100)

महिंद्रा ही इलेक्ट्रिक मायक्रो SUV कार जानेवारी 2023 मध्ये लॉन्च करू शकते. या कारमध्ये 15.9 kWh क्षमतेसह लिक्विड-कूल्ड बॅटरी पॅक असलेली BLDC इलेक्ट्रिक मोटर दिली जाऊ शकते. तसेच  या इलेक्ट्रिक एसयूव्हीची पॉवर रेंज एका चार्जवर 150 ते 175 किमी पर्यंत असू शकते.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI