Electric Scooters: देशात अलीकडेच बऱ्याच नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च होत आहे. मात्र यामध्ये बऱ्याच स्कूटरची रेंज कमी असल्याने त्यांना बाजारात चान्गला प्रतिसाद मिळत नाही आहे. अशातच जर तुम्हाला अधिक रेंज असलेली इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल, तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही मॉडेल्सबद्दल माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊ कोणत्या आहेत या स्कूटर... 


Gravton Quanta 


क्वांटा ब्रँडच्या लाइन-अपमधील हे पहिले उत्पादन आहे. यात 3kW ची इन-हाउस-बिल्ट BLDC मोटर देण्यात आली आहे. जी 180 Nm पीक टॉर्क आउटपुट तयार करते. याला ड्युअल बॅटरी पॅकमधून पॉवर मिळते, जे सरासरी 25 किमी प्रतितास वेगाने सुमारे 320 किमीची रेंज देऊ शकते. सध्या ही स्कूटर फक्त हैदराबाद, चेन्नई आणि बेंगळुरू या तीन शहरांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. याची प्रारंभिक किंमत 99,000 रुपये आहे.


Simple Energy One 


सिंपल एनर्जी सिंपल वन ही सेगमेंटमधील सर्वोत्तम दिसणारी स्कूटरपैकी एक आहे. ही भारतातील सर्वात जास्त रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटरपैकी एक आहे. याची कमाल रेंज 236 किमी आहे. यासोबतच अनेक फीचर्सही उपलब्ध आहेत. या स्कूटरची बुकिंग फक्त 1,497 टोकन रक्कम भरून करता येते. याची प्रारंभिक किंमत 1,09,999 रुपये आहे.


Ola S1 Pro


Ola S1 Pro ही भारतातील सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटरपैकी एक आहे. याची किंमत 1,29,999 (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते. S1 Pro 181 किमीची रेंज देते. ही स्कूटर 3.97 kWh बॅटरी पॅकवर धावते. वेगवान चार्जर वापरून S1 Pro फक्त 18 मिनिटांत 75 किमीपर्यंत चार्ज होऊ शकते, असं कंपनीचं म्हणणं आहे.


हिरो इलेक्ट्रिक NYX HX


Nyx HX ची किंमत 62,954 पासून सुरू होते. ही स्कूटर परवडणाऱ्या किमतीत उत्तम परफॉर्मन्स देते. यात 1.53 kWh पोर्टेबल बॅटरी पॅक मिळतो आणि पूर्ण चार्जिंगसाठी सुमारे 4-5 तास लागतात. याची रेंज 165 किमी आहे असून याची टॉप स्पीड 42 किमी प्रति तास इतकी आहे.


Okinawa i-Praise 


Okinawa i-Praise हे बाजारातील सर्वात जुन्या उत्पादनांपैकी एक आहे. यात 3.3 kWh ची लिथियम-आयन बॅटरी मिळते. स्कूटरला 1kW BLDC मोटरमधून 2.5kW चे पीक पॉवर आउटपुट मिळते. ही स्कूटर 139 किमीची रेंज देते. याची एक्स-शोरूम किंमत 1,09,000 रुपये आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI