Most Affordable 125cc Scooters: देशात स्कूटरची वेगळीच क्रेझ आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत स्कूटरच्या विक्रीचे प्रमाण वाढले आहे. गर्दीच्या भागातही स्कूटर सहज चालवता येते. स्त्री असो वा पुरूष, दोघांचंही स्कूटर हे आवडीचं वाहन आहे. तसेच स्कूटरमध्येही भरपूर जागा उपलब्ध असल्याने सामान ठेवणे सोपे जाते. तुम्हीही स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. आज आम्ही तुम्हाला 125cc इंजिनसह येणारी सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम स्कूटरबद्दल माहिती सांगणार आहोत.
SUZUKI ACCESS 125
या यादीतील पहिली स्कूटर आहे Suzuki Access 125. यामध्ये फॅमिली स्कूटरला आवश्यक असणारी सर्व वैशिष्ट्ये मिळतात. ही स्कूटर आता आणखी फीचर्स आणि मायलेजसह BS6 अपडेटसह विक्रीसाठी उपलब्ध आहे. यात 124cc सिंगल-सिलेंडर इंजिन मिळते. हे इंजिन 6,750 rpm वर 8.6 bhp आणि 5,500 rpm वर 10 Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. याची किंमत 75,024 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.
HONDA ACTIVA 125
यादीतील दुसरी स्कूटर Honda ActiVA 125 आहे. ही सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे. यातील इंजिन फ्युएल इंजेक्टेड तंत्रज्ञानासह येते. यात 124cc सिंगल सिलेंडर क्षमतेचे एअर-कूल्ड इंजिन आहे. ड्रायव्हिंग आरामदायी करण्यासाठी याच्या इंजिनमध्ये कंटिन्युअस व्हेरिएबल ट्रान्समिशन (CVT) वापरण्यात आले आहे. याचे इंजिन 8 bhp पॉवर आणि 10.3 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, याची किंमत 75,761 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.
TVS NTORQ 125
या यादीतील तिसरी स्कूटर TVS NTORQ 125 आहे. ही खूप चांगल्या फीचर्ससह येते. सर्वात महत्त्वाच्या फीचर्समध्ये याच्या ड्युअल-स्क्रीन सेटअपचा समावेश आहे, ज्यामध्ये एलसीडी आणि टीएफटी स्क्रीन आहे. यासोबतच कंपनीची पेटंट TVS SmartXonnect सिस्टीम देखील यामध्ये आहे. जी ब्लूटूथद्वारे स्मार्टफोनशी सहजपणे कनेक्ट करता येते. SmartXTalk आणि SmartXTrack सारखे फीचर्सही स्कूटरमध्ये पाहायला मिळतील. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, याची किंमत 82,592 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI