Electric Vehicle Fire: भारतात सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक कार Tata Nexon ला आग लागल्याची घटना नुकतीच घडली आहे. या आधी फक्त दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांना आग लागल्याच्या घटना समोर आल्या होत्या. मात्र आता चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांना आग लागल्याची घटना समोर आल्यानंतर इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. जागतिक इलेक्ट्रिक वाहनांच्या आगीच्या घटनांवर नजर टाकल्यास असे दिसते की EV आगीच्या घटना ICE कारच्या आगीच्या घटनांपेक्षा खूपच कमी आहेत.
इलेक्ट्रिक कारला आग लागल्यास त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. याचं मुख्य कारण म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये असलेले बॅटरी पॅक. इलेक्ट्रिक कारमध्ये असलेले बॅटरी पॅक आणि त्यातील रसायनांमुळे आग विझवणे फार कठीण होते. पेट्रोल/डिझेल कारमध्ये इंधनाची गळती हे आगीचे मुख्य कारण आहे, तर इलेक्ट्रिक वाहनांमध्ये थर्मल रनअवे जास्त चार्जिंगमुळे किंवा चुकीच्या थर्मल व्यवस्थापनामुळे होते.
तसेच इलेक्ट्रिक कारमध्ये अति उष्णतेची परिस्थिती असल्यास ही आग लागू शकते. हे मुंबईमधील टाटाची इलेक्ट्रिक कार नेक्सनच्या बाबतीतही घडलेले असू शकते. मुंबईतही उष्णतेच्या पाऱ्यात चढउतार सुरू असते. मात्र आम्ही टाटा मोटर्सच्या तपासातील अहवालाची वाट पाहत आहोत, यात आग लागण्याचे वेगेळे कारणही समोर येऊ शकते. कार उत्पादकांच्या बाजूने थर्मल व्यवस्थापन बळकट करणे हा मुख्य घटक आहे. परंतु बॅटरी पॅक डिझाइनमधील अनेक बदल भविष्यात EVs अधिक सुरक्षित करू शकतात. यामध्ये बॅटरी किंवा सेलची रचना हा एक मोठा घटक आहे.
इलेक्ट्रिक दुचाकीच्या तुलनेत इलेक्ट्रिक चारचाकी अधिक सुरक्षित मनाली जाते. यात पेट्रोल कारच्या तुलनेत आग लागण्याची शक्यता कमी असते. भारतात अजूनही इलेक्ट्रिक वाहने कमी प्रमाणात विकली जात आहेत. मात्र इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारात सर्वाधिक विक्री होणाऱ्या Nexon EV सोबत अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Car : महिंद्रा XUV700 ला देशातील सर्वात सुरक्षित वाहनाचा पुरस्कार जाहीर; मिळाले 5 स्टार रेटिंग
- Electric Scooter : Zapp ची 'ही' इलेक्ट्रिक स्कूटर 60 किमीची रेंज देईल; जाणून घ्या दमदार फीचर्स
- आता भारतातच होणार 'क्रॅश टेस्ट', Bharat-NCAP ला सरकारने दाखवला हिरवा कंदील
Car loan Information:
Calculate Car Loan EMI