Upcoming Cars in India 2023: आज ऑटो एक्स्पो 2023 चा शेवटचा दिवस आहे. या मोटार शोमध्ये अनेक बड्या कंपन्यांनी आपल्या वेगवेगळ्या कार (Upcoming Cars) आणि बाईक (Upcoming Bikes) सादर केल्या आहेत. यातील अनेक मॉडेल्स या वर्षाच्या अखेरीपूर्वी भारतीय बाजारपेठेत लॉन्च होऊ शकतात. यातच आज आम्ही तुम्हाला देशात लॉन्च होणाऱ्या टॉप अपकमिंग एसयूव्हीबद्दल सांगणार आहोत, ज्या लवकरच देशातील रस्त्यांवर धावताना पाहायला मिळतील. चला तर जाणून घेऊ कोणत्या आहेत या कार्स.... 


Maruti Suzuki Jimny : मारुती सुझुकी जिमनी 


मारुती सुझुकीने 2023 ऑटो एक्सपोमध्ये 5-डोअर जिमनी लाइफस्टाइल SUV सादर केली आहे. ज्याची बुकिंगही सुरू झाली आहे. ही कार 2023 च्या दुसऱ्या तिमाहीत लॉन्च होण्याची शक्यता आहे. SUV ला माईल्ड हायब्रिड तंत्रज्ञानासह 1.5-लीटर K15B पेट्रोल इंजिन मिळेल. जे 103bhp पॉवर आणि 134Nm टॉर्क जनरेट करते. हे 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह ऑफर केले जाईल. यासोबत ऑलग्रिप प्रो 4×4 सेटअप देखील उपलब्ध असेल.


Maruti Suzuki Fronx


Maruti Suzuki Fronx पुढील काही महिन्यांत लॉन्च होऊ शकते. याची बुकिंग देखील सुरू झाली आहे. ही कार NEXA डीलरशिपद्वारे विकली जाईल. यात स्मार्ट हायब्रीड तंत्रज्ञानासह 1.2-लिटर ड्युअलजेट पेट्रोल आणि 1.0-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनचा पर्याय मिळेल. कारमध्ये AMT सोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिकचा पर्याय दिला जाईल.


नवीन होंडा एसयूव्ही 


Honda दिलेल्या माहितीनुसार, कंपनी उन्हाळ्यात देशात आपली नवीन SUV सादर करेल आणि सणासुदीच्या हंगामात तिचे लॉन्चिंग अपेक्षित आहे. बाजारात ही कार Hyundai Creta, MG Aster, Skoda Kushaq आणि Maruti Grand Vitara सारख्या कारशी स्पर्धा करेल. ही कार Honda Amaze च्या अपडेटेड प्लॅटफॉर्मवर आधारित असेल, जी बरीच मोठी असेल. यात नवीन 10.2-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि 12.3-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली जाऊ शकते. तसेच ही कार ADAS ने सुसज्ज असू शकते.


Mahindra Thar 5 Door : महिंद्रा थार 5-डोअर 


महिंद्राने अलीकडेच आपली थार एसव्हीचा रियर व्हील ड्राइव्ह प्रकार लॉन्च केला आहे. ज्यामध्ये 1.5 लिटर टर्बो डिझेल आणि 2.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन उपलब्ध आहेत. यासोबतच कंपनी या वर्षाच्या मध्यापर्यंत 5-डोर थार लॉन्च करू शकते. ही कार सध्याच्या थारपेक्षा लांब असेल आणि तिला 2.2L टर्बो डिझेल आणि 2.0L टर्बो पेट्रोल इंजिन पर्याय मिळेल.


Hyundai Micro Suv : ह्युंदाई मायक्रो एसयूव्ही


Hyundai Motor लवकरच भारतात नवीन micro SUV लॉन्च करणार आहे. या कारचे कोडनेम Ai3 आहे. जे K1 प्लॅटफॉर्मवर डिझाइन करण्यात आले आहे. यात 1.2-लीटर NA पेट्रोल इंजिन मिळेल. जे मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्स पर्यायांसह ऑफर केले जाईल. ही कार टाटा पंच आणि Citroën C3 शी स्पर्धा करेल.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI