Tesla : एलोन मस्कच्या (Elon Musk) मालकीची इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाने (Tesla) 24,000 यूएस वाहने सुरक्षिततेसाठी परत मागवल्या आहेत. एका मीडिया रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
टेस्लाने 24,000 कार परत मागवल्या
टेस्लाने 24,000 यूएस 2017-2022 मॉडेल 3 वाहने सीट बेल्टच्या समस्येसाठी परत मागवल्या आहेत. याचे कारण म्हणजे या कारमधील सीट-बेल्टच्या त्रुटींमुळे या गाड्या कंपनीने परत मागवल्या आहेत. ऑस्टीन बेस्ड इलेक्ट्रिक वाहन कंपनीने सांगितले की, कार सर्व्हिस दरम्यान या कारच्या डावीकडील सीट बेल्ट बकल आणि मध्यभागी असेले सीट बेल्ट चुकीच्या पद्धतीने लावण्यात आले असल्याने या कार कंपनीने परत मागवल्या आहेत. कंपनीने नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशनला सांगितले की, त्यांच्याकडे कार संबंधित 105 सर्व्हिस दुरुस्तीसह वॉरंटी क्लेम्सचा रिपोर्ट आहे, ज्या यूएस वाहनांच्या रिकॉल समस्येशी संबंधित आहेत.
यूएस ऑटो सेफ्टी रेग्युलेटरने म्हटले..
डिसेंबर 2021 मध्ये रीअरव्ह्यू कॅमेरा आणि ट्रंकच्या समस्यांमुळे त्याच्या मॉडेल 3 आणि मॉडेल S इलेक्ट्रिक कारपैकी 475,000 हून अधिक कार परत मागवल्या होत्या, तर टेस्लाने त्याच्या सेल्फ-ड्रायव्हिंग सॉफ्टवेअरमधील त्रुटीमुळे 54,000 हून अधिक कार परत मागवल्या होत्या. त्यानंतर टेस्लाच्या कारमध्ये आणखी एक समस्या समोर आली आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये सीट बेल्ट रिमाइंडर अलर्टसाठी 8 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक कार परत मागवण्यात आल्या होत्या. यूएसमधील इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी देशातील 817,000 हून अधिक वाहने परत मागवत आहे कारण वाहन सुरू झाल्यानंतर सीट बेल्ट अलर्ट सक्रिय केला जात नाही. आणि चालकांना सीट बेल्ट घालण्याची आठवण करून देत नाही, असे यूएस ऑटो सेफ्टी रेग्युलेटरने म्हटले आहे.
ही समस्या काही वेळेसाठी मर्यादित
यावर ऑटोमेकरने सांगितले की, ही समस्या अशा काही वेळेसाठी मर्यादित आहे. दरम्यान, याच्या पहिल्या ड्राइव्ह सायकलमध्ये चाइममध्ये बिघाड झाला आणि त्यानंतर सीट बेल्ट बांधला गेलाच नाही. टेस्ला म्हणाले की जेव्हा कारचा वेग 22 किमी/तास पेक्षा जास्त असतो आणि ड्रायव्हर सीट बेल्ट बकल म्हणून कार्य करत नाही, तेव्हा ही समस्या ऑडिबल सीट बेल्ट रिमाइंडर सक्रिय करण्यावर परिणाम करत नाही.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI