iVOOMi JeetX Limited Edition: iVOOMi Energy भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. कंपनीने JeetX लिमिटेड एडिशन स्कूटर लॉन्च केल्याची घोषणा केली आहे. नवीन स्कूटरची किंमत 1.02 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. परंतु ग्राहक ही स्कूटर मर्यादित कालावधीसाठी 98,000 रुपयेच्या (एक्स-शोरूम) विशेष सवलतीच्या किंमतीवर खरेदी करू शकतात.
ही स्कूटर 10 नोव्हेंबरपर्यंत खरेदीसाठी उपलब्ध असल्याचे कंपनीने म्हटले आहे. याशिवाय कंपनीने आपल्या 'बिग एनर्जी फेस्ट'चा भाग म्हणून इलेक्ट्रिक वाहनांवर सवलत जाहीर केली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहक सर्व iVOOMi हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटरवर 4,000 रुपयांच्या सवलतीसह विशेष फायदे घेऊ शकतात.
कंपनी ग्राहकांना 5,000 रुपये किमतीच्या गिफ्ट्स आणि अॅक्सेसरीज मोफत देत आहे. कंपनीने सांगितले की, या ऑफर मर्यादित कालावधीसाठी वैध आहेत. नवीन iVOOMi JeetX लिमिटेड एडिशन स्कूटर तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये लाल हायलाइट्ससह ग्लॉसी ब्लॅक, ब्लू हायलाइट्ससह ग्लॉसी ब्लॅक, रेड हायलाइट्ससह मॅट व्हाइट आणि ऑरेंज हायलाइट्ससह मॅट व्हाइट यांचा समावेश आहे.
लिमिटेड एडिशन JeetX (JeetX) स्टॅंडर्ड मॉडेलपेक्षा महाग आहे. कंपनीने याची किंमत 95,999 रुपये (एक्स-शोरूम) निश्चित केली आहे. कंपनी iVOOMi S1 स्कूटर देखील विकते, जी 95,999 रुपयेच्या (एक्स-शोरूम) समान किंमतीला खरेदी केली जाऊ शकते. या स्कूटर बद्दल बोलताना iVOOMi एनर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक अश्विन भंडारी म्हणाले की, कंपनी अधिक टिकाऊ आणि पर्यावरणास अनुकूल वाहने आणण्यासाठी समर्पित आहे. ते म्हणाले की, कंपनीच्या सर्व स्कूटर्सची डिझाइन भारतीय राइडिंग परिस्थिती लक्षात घेऊन तयार केली आहे.
दरम्यान, नवीन ऑफर सर्व iVOOMi डीलरशिपवर उपलब्ध आहेत. कंपनी आपल्या ई-स्कूटर्सवर झिरो डाउन पेमेंटसह दरवर्षी 7% च्या किमान व्याजदरासह स्कूटर उपलब्ध करत आहे. वाहनांच्या ऑन-रोड किमतींवर 100% पर्यंत फायनान्स देखील केला जात आहे. वाहन पोर्टलच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात 14 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. तीनचाकी वाहनांमध्ये सर्वाधिक नोंदणीकृत इलेक्ट्रिक वाहने आहेत. देशात 8 लाख इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर आहेत, तर 5.50 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक दुचाकी नोंदणीकृत आहेत. तसेच नोंदणीकृत इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांची संख्या 55,000 युनिट्सपेक्षा जास्त आहे.
इतर महत्वाची बातमी:
Ola Electric Scooter Launched : Ola चा दिवाळी धमाका! कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च; 'ही' असेल किंमत
दरम्यान, अलीकडेच ओला इलेक्ट्रिकने S1 मालिकेतील तिसरे व्हेरिएंट म्हणून ओला एस1 एअर (Ola S1 Air) इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. कंपनीची आतापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे. कंपनीने आपल्या या स्कूटरची किंमत 85,000 रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवली आहे.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI