Tesla Car Under 20 Lakh: जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार निर्माती कंपनी टेस्ला (Tesla) लवकरच भारतात येणार आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या मालकीची अमेरिकन कंपनी (American Multinational Automobile Manufacturer) टेस्ला भारतीय बाजारात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. 20 लाखांपेक्षा कमी किंमतीची टेस्ला कार 2026 मध्येच भारतात लाँच केली जाऊ शकते, परंतु त्याआधी 60 लाख रुपये किंमत असलेली मॉडेल 3 देखील लवकरच बाजारात लाँच केली जाऊ शकते. तुम्हाला 20 लाख रुपयांच्या खाली Tesla विकत घ्यायची असल्यास, तुम्हाला आणखी काही वर्षं वाट पाहावी लागेल.


टेस्ला (Tesla) भारतात तिच्या काही CBU उत्पादनांसह म्हणजेच मॉडेल 3 आणि Y मध्ये प्रवेश करेल. त्यांची किंमत 60 लाख रुपये असू शकते आणि जर सूट दिली गेली तर ही किंमत थोडी कमी होऊ शकते.


लवकरच सुरू होणार विक्री


सर्वात स्वस्त मॉडेल असलेली टेस्ला 3 ही एक लक्झरी कार आहे, जी प्रीमियम सेडान म्हणून बाजारात येते आणि तिची किंमत 20 लाखांहून कमी होणार नाही. मॉडेल Y आणि 3 या टेस्लाच्या लाइनअपमधील प्रमुख कार असतील आणि त्यांची विक्री पुढील वर्षी भारतात सुरू होण्याची अपेक्षा आहे.


परवडणारी टेस्ला कार 2026 पर्यंत येईल


भारतात बनवलेल्या टेस्ला कार हे सर्वात मोठं आकर्षण आहे, या कार 2026 च्या आसपास बाजारात येऊ शकतात आणि त्यांची किंमत सुमारे 20 लाख रुपये असू शकते. हे टेस्लाचं मॉडेल 2 असू शकतं, जे मॉडेल 3 च्या खाली कमी उपकरणांसह कंपनीच्या लाइनअपमध्ये स्थित असेल.


टेस्लाचं पहिलं ऑफिस पुण्यात


टेस्लाचं पहिलं भारतातील कार्यालय पुण्याात सुरु होणार आहे. टेस्लानं ऑफिससाठी पुण्यातील विमान नगर भागात पंचशील टेक पार्कची निवड केली आहे. विमान नगर भागातील पंचशील टेक पार्कमध्ये टेस्ला कंपनी जागा भाड्यानं घेतली आहे. इथल्या पहिल्या मजल्यावरील 5 हजार 800 स्क्वेअर फूट जागा टेस्ला कंपनीनं तीन वर्षांसाठी भाड्यानं घेतली आहे. याचं मासिक भाडं 11.65 लाख रुपये असणार आहे. ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याला टेस्लाच्या येण्याने प्रगतीच्या आणखी मोठ्या संधी खुल्या होणार आहेत. 


20 लाखांची टेस्ला


टेस्ला कंपनी भारतात स्थापन करण्याच्या विचारात असलेल्या प्लांटची वार्षिक उत्पादन क्षमता अंदाजे 5 लाख इलेक्ट्रिक वाहने असेल. एवढेच नाही तर कंपनीच्या इलेक्ट्रिक कारची सुरुवातीची किंमत 20 लाख रुपये असू शकते. 


हेही वाचा:


Best Mileage Tips: गाडी चालवा, पण स्मार्ट पद्धतीने! मिळेल चांगलं मायलेज; वाचतील दोन पैसे


Car loan Information:

Calculate Car Loan EMI