Tata Tiago NRG XT: स्वदेशी वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने देशात नवीन Tiago NRG XT व्हेरिएंट लॉन्च केला आहे. कारच्या एंट्री-लेव्हल हॅचबॅक कार Tiago चे XT व्हेरिएंट अपडेट करण्याच्या उद्देशाने कंपनीने ही कार लॉन्च केली आहे. यामध्ये अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहे. मारुती सुझुकी आणि ह्युंदाई मोटर्सच्या हॅचबॅक सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी टाटाने ही अपडेटेड कार लॉन्च केली आहे. टाटाने काही दिवसांपूर्वी Tiago चे XZ आणि XZA ट्रिम बंद केले होते. कंपनीने काही दिवसांपूर्वी आपल्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या SUV Nexon चा XM+ प्रकार देखील लॉन्च केला होता. या नव्या टियागोमध्ये काय खास आहे हे जाणून घेऊ.


फीचर्स 


या कारच्या नवीन फीचर्सबद्दल सांगायचे तर, आता ग्राहकांना या हॅचबॅकमध्ये 14-इंच हायपरस्टाईल व्हील, बी-पिलर टेप, को-ड्रायव्हर साइट व्हॅनिटी मिरर, उंची अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि रिअर पार्शल सेल्फ यासारखे नवीन फीचर्स मिळतील. यासोबतच हरमनची ऑडिओ सिस्टीम, 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, रियर व्ह्यू कॅमेरा आणि 4 ट्वीटरही देण्यात येणार आहेत. कारमध्ये फ्रंट फॉग लॅम्प्स, ब्लॅक आऊट रूफसह रूफ रेल, रिअर डीफॉगर, चारकोल ब्लॅक इंटिरियर्स, रिअर वॉशर आणि वायपर्स यांसारखी फीचर्स दिले आहेत.


किंमत 


टाटाचे Tiago मॉडेल देशात XE, XM, XT(O), XT, XZ आणि XZ+ सारख्या ट्रिम लेव्हलमध्ये 16 व्हेरिएंटमध्ये लॉन्च केले आहेत. ज्याची किंमत 5.40 लाख ते 7.82 लाख रुपये आहे. या कारवर सीएनजीचा पर्यायही उपलब्ध आहे. तसेच नवीन Tiago NRG ची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 6.83 लाख रुपये आहे. जी याच्या टॉप एंड व्हेरियंटसाठी 7.38 लाख रुपयांपर्यंत जाते. कंपनीकडे देशातील हॅचबॅक आणि सेडान सेगमेंटमध्ये Tiago आणि Tigor सारख्या परवडणाऱ्या कार आहेत. कंपनीकडे मायक्रो एसयूव्ही सेगमेंटमध्ये पंचची लांब रेंज आणि एसयूव्ही सेगमेंटमध्ये नेक्सॉन, सफारी, हॅरियर आणि इतर कार आहेत.


महत्वाच्या बातम्या : 



 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI