Yamaha Upcoming Bike : प्रसिद्ध बाईक कंपनी यामाहाने (Yamaha) 2015 साली आपली नवीन बाईक Yamaha YZF-R3 लॉन्च केल्यानंतर खूप प्रसिद्धी मिळवली. आता यामाहा या बाईकला नवीन मॉडेल देण्याच्या तयारीत आहे. यामाहा या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर हे नवीन अपडेटेड मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या बाईकचे BS6 व्हर्जन फार पूर्वी लॉन्च करण्याची तयारी होती मात्र कोरोनामुळे या बाईकच्या लॉन्चिंगला बराच उशीर झाला. 


काय बदल असतील? 


Yamaha ने YZF-R3 2022 व्हेरियंट अनेक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लॉन्च केली. भारतात ही बाईक बंद झाल्यापासून यामध्ये नवीन रंगांच्या ऑप्शनसह अनेक बदल करण्यात आले आहेत. या बाईकच्या 2022 व्हेरियंटमध्ये नवीन डिझाइनसह अनेक प्रगत वैशिष्ट्ये मिळण्याची अपेक्षा आहे.


'या' कारणामुळे कमी विक्री होत होती


Yamaha च्या बाईक्सच्या प्रीमियम रेंजमध्ये YZF-R3 चे नाव आहे. ज्याची किंमत लॉन्च झाल्यानंतर 3.25 लाख रुपये होती. जास्त किंमतीमुळे ही बाईक विक्रीच्या बाबतीत फारशी चांगली कामगिरी करू शकली नाही. सध्या या बाईकची किंमत 3.51 लाख रुपये आहे. बाजारात ही बाईक KTM RC 390 आणि TVS Apache RR310 सारख्या मोटरसायकलशी स्पर्धा करते.


वैशिष्ट्ये :


Yamaha R3 ला एक संपूर्ण डिजिटल कन्सोल मिळतो जो इंधन, वेळ, रायडिंग मीटर, सरासरी मायलेज, गियर परिस्थिती यासारखी अनेक वैशिष्ट्ये ऑफर करतो. याला पॅनल रियर-सेट फूटपेग्स आणि लो-सेट हँडलबारसह राइडिंग स्टॅन्स देखील मिळतो.


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI