Tata Safari Dark edition : भारतातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी असणाऱ्या टाटा मोटर्सने (Tata Motors) त्यांच्या आलिशान गाड्यांमध्ये टॉपमध्ये मोजल्या जाणाऱ्या सफारी कारचं (Safari Car) नवं मॉडेल रिलीज केलं आहे. टाटाने सफारी डार्क एडिशन (Safari DARK) नुकतंच लॉन्च केलं आहे. काळ्या रंगात असणाऱ्या या कारचा लूक हा लगेच डोळ्यात भरणारा आहे.


सध्याच्या बाजारात असणाऱ्या सफारी कार्सच्या किंमतीत 20 चे 60 हजारांहून अधिक किंमत या सफारी डार्क एडिशनची आहे. कंपनीने सध्या देशभरात डीलरशिपवर या कारची बुकिंग सुरु केली आहे. सध्या   Safari DARK एडिशन XT+/XTA+ आणि XZ+/XZA+या ट्रिम्समध्ये येते. 


कसं आहे इंजिन ?


टाटा सफारी डार्कमध्ये 2.0-लीटरचं डीझेल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 168bhp आणि 350Nm पर्यंत पीक टॉर्क जनरेट करू शकतो. याशिवाय कारमध्ये 6-स्पीड मॅन्युल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आलं आहे. 


बाजारात कोणते पर्याय ?


Tata Safari या कारची Hyundai Alcazar, Mahindra XUV700, MG Hector Plus आणि नुकतीच आलेली Kia Carens या मॉडेलशी टक्कर होत आहे. दरम्यान कंपनीने आतापर्यंत या कारची अधिकृत किंमत दिली नसली तरी जुन्या सफारीच्या तुलनेत ही कार 20 ते 60 हजारांनी महाग आहे. 


हे ही वाचा : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



Car loan Information:

Calculate Car Loan EMI