Tata Electric Car : दिग्गज वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्स (Tata Motors) सध्या 80% मार्केट शेअरसह इलेक्ट्रिक वाहनांच्या सेगमेंटमध्ये देशातील आघाडीची कंपनी आहे. सतत वाढणारी मागणी पूर्ण करण्यासाठी देशात 1 लाख इलेक्ट्रिक वाहने तयार करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. कंपनी सध्या Tiago EV, Tigor EV, Nexon EV Prime आणि Nexon EV Max सारख्या इलेक्ट्रिक कारसह बाजारात इतर कारबरोबर स्पर्धा करतेय. याबरोबरच कंपनी आपल्या सध्याच्या अनेक कार इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, टाटा पंच SUV लवकरच त्याच्या इलेक्ट्रिक कारमध्ये सादर केली जाणार आहे. 


ऑटो एक्स्पोमध्ये सादर केली जाणार


टाटा मोटर्सने 2020 ऑटो एक्स्पोमध्ये त्यांच्या हॅचबॅक अल्ट्रोझचे इलेक्ट्रिक प्री-प्रॉडक्शन मॉडेल प्रदर्शित केले आणि भारतीय रस्त्यांवर त्याची अनेकदा हेरगिरी केली गेली. पण या कारपूर्वी 2023 ऑटो एक्सपोमध्ये सादर करण्याची ज्या कारची शक्यता आहे ती कार म्हणजेच टाटा पंच इलेक्ट्रिक बाजारात येण्याची शक्यता आहे.


अल्फा प्लॅटफॉर्मवर तयार होईल


Tata Punch EV ची स्पर्धा 2023 मध्ये लॉन्च होणाऱ्या Citroen eC3 बरोबर होईल. या कारला 350 किमी पर्यंतची रेंज मिळण्याची अपेक्षा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंच इलेक्ट्रिक दोन बॅटरी ऑप्शनसह ऑफर केली जाऊ शकते, ज्यामध्ये 300 किमी ते 350 किमीची रेंज मिळू शकते. पंच EV नवीन ALFA मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर आधारित टाटाची पहिली EV असेल. ALFA प्लॅटफॉर्म इलेक्ट्रिक, ICE आणि Hybrid यासह अनेक इंजिन पर्यायांशी सुसंगत आहे. या प्लॅटफॉर्मवर अल्ट्रोझ हॅचबॅक देखील तयार करण्यात आला आहे. 


वैशिष्ट्ये काय आहेत?


पंच EV ला त्याच्या ICE व्हर्जनसारखी वैशिष्ट्ये मिळण्याची शक्यता आहे. यात अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले सपोर्टसह 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मल्टी-मोड रीजनरेटिव्ह ब्रेकिंग, ट्रॅक्शन कंट्रोल, iTPMS, लेदर अपहोल्स्ट्री, ऑटोमॅटिक एसी, पॉवर्ड ORVM, क्रूझ कंट्रोल, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, सोबत मिळेल. EBD. ABS सोबत, इतर वैशिष्ट्ये अपेक्षित आहेत.


खर्च किती असेल?


टाटा पंचची ICE व्हर्जन सध्या बाजारात 6 लाख ते 9.54 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. नवीन Tata Punch EV ची किंमत सुमारे 11 लाख ते 13 लाख रुपये असू शकते.


महत्त्वाच्या बातम्या : 


Electric Bullet: फक्त 1.5 लाख रुपयात खरेदी करू शकता इलेक्ट्रिक बुलेट, देते 150 किमीची रेंज


Car loan Information:

Calculate Car Loan EMI