Keeway Two Wheeler: युरोपमधील प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी Keeway भारतात एण्ट्री केली आहे. कंपनीने आज भारतीय बाजारपेठेत आपली K-Light 250 क्रूझर बाईक,  Vieste 300 maxi-scooter आणि Sixties 300i स्कूटर लॉन्च केली आहे. कंपनीने याची बुकिंग देखील सुरू केली आहे. ग्राहक 10 हजार रुपयांच्या टोकन रक्कमसह या दुचाकी बुक करू शकतात. या दुचाकींची डिलिव्हरी कंपनी जूनपासून सुरू करू शकते. Keeway या वर्षाच्या अखेरीस आणखी पाच मॉडेल्स लॉन्च करणार आहे.


Keyway ने लाँच केलेल्या तिन्ही दुचाकींची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी पुढील आठवड्यापर्यंत किंमती जाहीर करू शकते. दुचाकींच्या वितरणासाठी किवेने आदिश्वर ऑटो राइड इंडियाशी हातमिळवणी केली आहे. कंपनी देशभरात आदिश्वर ऑटोच्या 40 हून अधिक डीलरशिपद्वारे डिलिव्हरी करेल.


K-Light 250 ही 250cc क्रूझर बाईक आहे. व्ही-ट्विन इंजिन आणि बेल्ट ड्राईव्ह सिस्टीमसह लॉन्च करण्यात आलेली ही पहिली बाईक आहे. K-Light 250 तीन रंग प्रकारांमध्ये उपलब्ध आहे - मॅट ब्लॅक, मॅट ब्लू आणि मॅट डार्क ग्रे. ही बाईक थेट रॉयल एनफिल्ड, येझदी रोडस्टर आणि बेनेली इम्पेरिअलशी स्पर्धा करेल.


Vieste 300 ही 278.2cc मॅक्सी स्कूटर आहे. याच्या समोरील बाजूस वापरकर्त्यांना हेडलॅम्पसह चार एलईडी प्रोजेक्टर मिळतील. ही मॅक्सी स्कूटर 12 लीटर इंधन टाकीसह येते. यामध्ये यूजर्सला मॅट ब्लॅक, मॅट ब्लू आणि मॅट व्हाईट असे तीन कलर व्हेरियंट मिळतात. याची स्पर्धा Yamaha Aerox 155 आणि BMW C400 GT शी होईल.


Sixties 300i ही 278.2cc रेट्रो क्लासिक स्कूटर आहे. रेट्रो लुकसाठी याला षटकोनी हेडलाइट आणि स्प्लिट सीट मिळते. ही स्कूटर मॅट लाइट ब्लू, मॅट व्हाईट आणि मॅट ग्रे या तीन रंगातही उपलब्ध आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Tata Tiago: टाटाने आपल्या सर्वात स्वस्त कारच्या किंमतीत केली वाढ; जाणून घ्या मॉडेल आणि किंमत


Upcoming Electric Cars: भारतात लवकरच लॉन्च होणार 'या' तीन नवीन इलेक्ट्रिक कार


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI