Tata Nexon CNG: सीएनजी वाहनांच्या वाढत्या मागणीमुळे, मारुती सुझुकी (Maruti Suzuki) तसेच टाटा मोटर्स (Tata Motors ), ह्युंदाई (Hyundai ), किया (Kia ) आणि टोयोटा (Toyota ) सारख्या कार निर्मात्या कंपन्या त्यांच्या सीएनजी श्रेणीचा विस्तार करण्याचा विचार करत आहेत. इंडो-जपानी ऑटोमेकर मारुती सुझुकी नवीन मारुती ब्रेझा सीएनजी, बलेनो सीएनजी आणि स्विफ्ट सीएनजीसह एर्टिगा एमपीव्हीचे तीन नवीन सीएनजी प्रकार आणण्यासाठी सज्ज आहे. Hyundai देखील व्हेन्यूच्या CNG प्रकार आणि Kia's Sonet SUV वर काम करत असल्याची माहिती आहे. टाटा मोटर्स Nexon सीएनजी आणेल, तर जपानी कार निर्माता टोयोटा ग्लान्झा फॅक्टरी फिट सीएनजीसह बाजारात उतरण्यासाठी सज्ज आहे.


अलीकडेच Tata Nexon CNG देशात चाचणी दरम्यान दिसली आहे. हे नवीन मॉडेल 1.2-लिटर रेव्होट्रॉन टर्बो पेट्रोल इंजिन आणि दोन गिअरबॉक्स पर्यायांसह 6-स्पीड मॅन्युअल आणि AMT येण्याची शक्यता आहे. 120 bhp आणि 170 Nm आउटपुट करणार्‍या नियमित गॅसोलीन युनिटच्या तुलनेत, SUV च्या CNG प्रकारात 15 bhp कमी पॉवर मिळण्याची शक्यता आहे. मात्र ही कार जास्त मायलेज देऊ शकते. सीएनजी किटमधून बूट स्पेसमध्ये काही प्रमाणात कपात होण्याची शक्यता आहे. Tata Nexon CNG प्रकारात इतर कोणतेही बदल पाहायला मिळणार नाही.






एका रिपोर्टनुसार, टाटा मोटर्स नजीकच्या भविष्यात पंच सीएनजी सादर करू शकते. मिनी एसयूव्ही 1.2-लिटर पेट्रोल इंजिनसह येईल. जी फॅक्टरी फिट सीएनजी किटशी जोडली जाईल. गॅसोलीन युनिट 85 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करते. टाटा पंच CNG चे पॉवर आणि टॉर्कचे आकडे वेगवेगळे असू शकतात. हे मॅन्युअल आणि एएमटी दोन्ही गिअरबॉक्ससह ऑफर केले जाईल.


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI