Tata Jet Edition: स्वदेशी वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने आपल्या नेक्सन, हॅरियर, सफारीचे जेट एडिशन लॉन्च केले आहे. या स्पेशल एडिशनमध्ये बाहेरील आणि आतील भाग अपडेट करण्यात आले आहेत. टाटाच्या जेट एडिशन एसयूव्हीला प्रीमियम फील देण्यासाठी स्टारलाईट कलर पर्यायात आणण्यात आले आहे. यासह नवीन फीचर्स आणि उपकरणे जोडली गेली आहेत. जी यात प्रीमियम आणि लक्झरी अनुभव देतात.


Tata Jet Edition SUV आजपासून देशभरातील डीलरशिपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. नेक्सन जेट एडिशन 12.13 लाख रुपये, हॅरियर 20.90 लाख रुपये आणि सफारी 21.35 लाख रुपये या किमतीत उपलब्ध आहे. Nexon Jet Edition 4 प्रकारांमध्ये, Safari Jet Edition 4 प्रकारांमध्ये आणि Harrier Jet Edition 2 प्रकारांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.


जेट एडिशन मॉडेल काय आणि कसे आहे?


टाटाचे जेट एडिशन, सध्याच्या मॉडेलच्या टॉप व्हेरिएंटवर आधारित एक लक्झरी मॉडेल असून हे एक अद्वितीय ड्युअल टोन - स्टारलाईट रंग पर्यायासह येते. ज्याची बॉडी ब्राँझ आणि रूफ सिल्व्हर प्लॅटिनममध्ये आहे. तसेच कारला जेट ब्लॅक अलॉय व्हील आणि पुढील आणि मागील बाजूस सिल्व्हर स्किड प्लेट्स देण्यात आल्या आहेत. जे त्यांना खूप आकर्षक बनवतात.


याच्या इंटीरियरबद्दल बोलायचे झाले तर लक्झरी ड्युअल-टोन ऑयस्टर व्हाइट आणि ग्रॅनाइट ब्लॅक कलर देण्यात आला आहे. याच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर टेक्नो-स्टील ब्राँझ फिनिश मिड पॅड, डोअर आणि फॉलरवर ब्राँझ कलर दिले आहेत. याच्या समोर सीटच्या हेडरेस्टवर जेट एम्ब्रॉयडरी वापरण्यात आली असून सीटवर ब्राँझ धागा वापरण्यात आला आहे. ज्यामुळे संपूर्ण कारला लक्झरी फील मिळतो.


टाटा हॅरियर आणि सफारी जेट एडिशन 


दोन्ही SUV मध्ये आधुनिक ESP सुरक्षा फंक्शन्स आहेत. ज्यात ड्रायव्हर डोस ऑफ अलर्ट, पॅनिक ब्रेक अलर्ट, आफ्टर इम्पॅक्ट ब्रेकिंग सारखे फीचर्स मिळतात. यासोबतच दोन्ही एसयूव्हींना सर्व रोमध्ये सी प्रकारचे यूएसबी चार्जर, फक्त सफारीमध्ये दुसऱ्या रांगेत आणि कॅप्टन सीटवर हेड रिस्ट्रेंट मिळतात. यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिकमध्ये 4 डिस्क ब्रेकसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक देण्यात आले आहेत. दोन्ही एसयूव्हीमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो, अॅपल कारप्ले, एअर प्युरिफायर आणि वायरलेस चार्जर देखील देण्यात आले आहेत. इंटिरिअर आणखी चांगले बनवण्यासाठी याला तीन एरोसह ऑयस्टर व्हाइट, बेनेक-कॅलिको लेदर सीट आणि काही ठिकाणी ब्राँझ अॅक्सेंट देण्यात आले आहेत.


टाटा नेक्सन जेट एडिशन


टॉप एंड मॉडेलच्या सर्व फीचर्ससह या प्रकारात व्हेंटिलेटेड स्पेस, टिल्ट फंक्शनसह इलेक्ट्रिक सनरूफ, AQI डिस्प्लेसह एअर प्युरिफायर आहे. त्यात वायरलेस चार्जरही जोडण्यात आला आहे. यासह बाहेरील आणि आतील भागात  नवीन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध केले गेले आहेत. ज्यामुळे ते अतिशय आकर्षक दिसते.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI