Maruti Suzuki SPresso Variants Discontinued: वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने एस्प्रेसोला (SPresso) कायमचा ब्रेक लावला आहे. मायक्रो एसयूव्ही म्हणून बाजारात आणल्या या कारच्या अनेक प्रकारांची विक्री थांबवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. या कारची घटती विक्री यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे. जर तुम्ही देखील मारुती एस्प्रेसो खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर जाणून घ्या कंपनी एस्प्रेसोचे कोणते प्रकार बंद करणार आहे.
या प्रकारांची विक्री होणार बंद
मारुती सुझुकीने एस्प्रेसोच्या सहा प्रकारांची विक्री थांबवली आहे. ज्यामध्ये पहिला प्रकार स्टँडर्ड आहे, दुसरा LXI, तिसरा LXI CNG, चौथा VXi, पाचवा VXi AMT (VXI MT) आणि सहावा प्रकार VXi. CNG ( VXI CNG). हे प्रकार बंद केल्यानंतर एस्प्रेसोच्या स्टँडर्ड (O) प्रकाराला त्याचे बेस मॉडेल म्हटले जाईल. यासोबतच कंपनी पर्यायी पॅकेज अंतर्गत उपलब्ध VXI+(0) या टॉप व्हेरियंटची विक्री देखील सुरू ठेवेल.
एका अहवालानुसार, गेल्या एका आर्थिक वर्षात एस्प्रेसोच्या 64,000 युनिट्सची विक्री झाली आहे. या विक्री अहवालानुसार, कंपनी दर महिन्याला या एसयूव्हीच्या सुमारे 5300 युनिट्सची विक्री करते. परंतु जून 2022 मध्ये या वाहनाची विक्री केवळ 652 युनिट्सवर आली.
SPresso चे स्पेसिफिकेशन
SPresso मध्ये 998cc चे 1 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 68 PS पॉवर आणि 90 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स उपलब्ध आहे. मारुतीचा दावा आहे की, ही एस्प्रेसो 21.4 kmpl चा मायलेज देते. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, फ्रंट पॉवर विंडो, कीलेस एंट्री, पुढच्या सीटवर ड्युअल एअरबॅग, मागील पार्किंग सेन्सर्स, स्पीड अलर्ट, ABS, EBD आणि सीट बेल्ट रिमाइंडर मिळेल.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI