Tata Harrer and Curvv EV India launch Date : नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याची लोकांमध्ये नेहमीच क्रेझ असते आणि ती हळूहळू वाढत आहे. टाटा मोटर्सच्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांची लोक आतुरतेने वाट पाहत असतात. सध्या, Nexon EV आणि Tiago EV सोबत Tigor EV सारख्या इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicle) बंपर विक्री होत आहे. आता पुढच्या वर्षी म्हणजे 2024 पर्यंत, Tata Motors च्या आणखी 4 इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यासाठी सज्ज आहेत. टाटाच्या आगामी EV मध्ये पंच आणि हॅरियरच्या इलेक्ट्रिक व्हर्जन तसेच फेसलिफ्टेड Nexon EV आणि Curve EV यांचा समावेश असू शकतो. याच कारच्या वैशिष्ट्यांबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. 


Tata Harrier EV आणि Curve EV


टाटा मोटर्सने (Tata Motors) यावर्षी ऑटो एक्सपोमध्ये हॅरियर एसयूव्हीच्या इलेक्ट्रिक मॉडेलचे प्रदर्शन केले आणि आता या इलेक्ट्रिक एसयूव्हीचे उत्पादन तयार मॉडेल पुढील वर्षी लॉन्च होण्याची शक्यता आहे. याबरोबरच कर्व्ह ईव्ही (Curve EV) सारखी इलेक्ट्रिक एसयूव्ही देखील पुढील वर्षी लाँच होण्याची शक्यता आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी आगामी EV प्लॅन्सबद्दल सांगितले आहे की, Tata Motors India सोबत, Jaguar Land Rover देखील इलेक्ट्रिक वाहनांबाबत अनेक नवीन गोष्टी करण्याची तयारी करत आहे. Nexon EV चे फेसलिफ्ट मॉडेल सर्वात आधी येईल, त्यानंतर हॅरियर (Harrier), पंच (Punch) आणि कर्व्ह ईव्ही (Curvv EV) लॉन्च होईल. 


नवीन TATA HARRIER EV : टाटा मोटर्सने 2023 ऑटो एक्सपोमध्ये Harrier EV कॉन्सेप्ट प्रदर्शित केली. ईव्ही कॉन्सेप्टचे उत्पादन व्हर्जन या वर्षीच्या अखेरीस सादर केली जाण्याची अपेक्षा आहे. यात वाहन-टू-लोड (V2L) आणि वाहन-टू-वाहन (V2V) चार्जिंग क्षमतेसह AWD प्रणाली मिळू शकते. हे सुमारे 60kWh बॅटरी पॅकसह येऊ शकते, जे सुमारे 400-500 किमी रेंज प्रदान करू शकते.


TATA CURVV EV : Tata Motors ने 2023 ऑटो एक्स्पोमध्ये Curve SUV कॉन्सेप्ट पुन्हा प्रदर्शित केली. 2024 च्या पहिल्या सहामाहीत ही कार भारतीय बाजारात लॉन्च होण्याची शक्यता आहे. या कारची रेंज 400 किमी पेक्षा जास्त असू शकते आणि सुमारे 40kWh चा बॅटरी पॅक असू शकतो.


महत्त्वाच्या बातम्या : 


महिंद्रा XUV 400 आता अधिक सुरक्षित, EL प्रकारात अनेक नवीन सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश; किंमत माहितीये?


Car loan Information:

Calculate Car Loan EMI