पुणे : टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोबाइल उत्‍पादक कंपनीने आज ऑल-न्‍यू अल्‍ट्रोजच्‍या लाँचची घोषणा केली. आकर्षक डिझाइन, लक्‍झरीअस इंटीरिअर्स आणि प्रगत वैशिष्‍ट्यांनी ऑल-न्‍यू अल्‍ट्रोज सुसज्ज आहे. या गाडीची सुरूवातीची किंमत ६.८९ लाख रूपये आहे.

प्रीमियम डिझाइन, अद्वितीय सुरक्षितता, अत्‍याधुनिक तंत्रज्ञान आणि थरारक कार्यक्षमता या मुलभूत आधारस्‍तंभांवर गाडीची निर्मिती करण्यात आली आहे. यात नवीन एक्‍स्‍टीरिअर व लक्‍झरीअस तंत्रज्ञान-संपन्‍न केबिनपासून सुधारित कनेक्‍टीव्‍हीटी आणि विस्‍तारित मल्‍टी-पॉवरट्रेन लाइन-अपपर्यंतचा समावेश आहे.

अल्‍ट्रोजने प्रीमियम हॅचबॅक विभागामध्‍ये बेंचमार्क म्‍हणून स्‍वत:चा दर्जा स्‍थापित केला आहे. ५-स्‍टार जीएनसीएपी रेटिंग मिळणारी पहिली व तिच्‍या श्रेणीमधील एकमेव असलेल्‍या या कारने सुरूवातीपासून सुरक्षिततेमध्‍ये नवीन मानक स्थापित केले आहेत.

या कारमध्‍ये असलेल्या वैशिष्ट्यांमध्ये आकर्षक डोअर हँडल्स व इन्फिनिटी कनेक्‍टेड एलईडी टेल लॅम्‍प्‍स, तसेच ल्‍युमिनेट एलईडी हेडलॅम्‍प्‍ससह एकीकृत डीआरएल आणि आकर्षक ३डी फ्रण्‍ट ग्रिल्स आहेत. आतील बाजूस, एक्झिक्‍युटिव्‍ह लाऊंज-स्‍टाइल रिअल सीट्ससह सुधारित थाय सपोर्ट, सॉफ्ट-टच ग्रँड प्रीस्टिजिया डॅशबोर्ड, अॅम्बियण्‍ट लायटिंग आणि एैसपैस जागा एकत्रित केबिनमध्‍ये उत्‍साहवर्धक अनुभव देतात.

पेट्रोल, सेगमेंटमधील एकमेव डिझेल आणि टाटा मोटर्सचे आघाडीचे आयसीएनजी ट्विन सिलिंडर तंत्रज्ञानामध्‍ये ऑफर करण्‍यात आलेली ऑल-न्‍यू अल्‍ट्रोज विविध ट्रान्‍समिशन पर्यायांमध्‍ये देखील उपलब्‍ध असेल. ५-स्‍पीड मॅन्‍युअल, सुधारित ६-स्‍पीड डीसीए आणि नवीन ५-स्‍पीड एएमटी, ज्‍यामुळे अधिकाधिक ग्राहकांना ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशनची सोयीसुविधा मिळेल.

या दाखलीकरणासंदर्भात टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍स लि. आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि. चे व्‍यवस्‍थापकीय संचालक शैलेश चंद्रा म्‍हणाले, “नव्या गाडीमध्ये आधुनिक स्‍टायलिंग, प्रीमियम अनुभव, तंत्रज्ञान संपन्‍न वैशिष्‍ट्ये, उच्‍च स्‍तरीय सुरक्षितता आणि पॉवरट्रेन पर्यायांची व्‍यापक श्रेणी. ड्रायव्हिंग अनुभव उत्‍साहित करण्‍यासाठी प्रत्‍येक घटक काळजीपूर्वक डिझाइन करण्‍यात आला आहे. त्यामुळे ऑल-न्‍यू अल्‍ट्रोज तिच्‍या मालकांना ‘फिल स्‍पेशल' अनुभव देईल.''

ऑल न्‍यू अल्‍ट्रोज बाबत

ऑल-न्‍यू अल्‍ट्रोज स्‍लीक, शिल्‍पाकृती लाइन्‍स आणि आकर्षक ३डी फ्रण्‍ट ग्रिलसह आधुनिक आकर्षकतेला नव्‍या उंचीवर घेऊन जाते. या वेईकलमधील फ्लोटिंग रूफ डिझाइन आणि आकर्षक डोअर हँडल्‍स तिच्‍या फ्यूचरिस्टिक अपीलमध्‍ये अधिक भर करतात, ज्‍यामुळे अल्‍ट्रोजला डायनॅमिक उपस्थिती मिळते, जी तिला सेगमेंटमध्‍ये वरचढ ठरवते. प्रिस्टिन व्‍हाइट, प्‍युअर ग्रे, रॉयल ब्‍ल्‍यू, अंबर ग्‍लो आणि ड्यून ग्‍लो या पाच आकर्षक रंगांमध्‍ये, तसेच स्‍मार्ट, प्‍युअर, क्रिएटिव्‍ह, अकॉम्‍प्‍लीश एस आणि अॅकॉम्‍प्‍लीश+ एस या विशिष्‍ट परसोनामध्‍ये उपलब्ध नवीन अल्‍ट्रोज टाटा मोटर्सच्‍या वैयक्तिककरणावरील फोकसशी बांधील आहे.

प्रत्‍येक वैशिष्‍ट्यासह विशेष अनुभव घ्‍या - सुधारित डिझाइन

ऑल-न्‍यू टाटा अल्‍ट्रोजने आकर्षकता, आरामदायीपणा आणि नाविन्‍यतेच्‍या विनासायास संयोजनासह प्रीमियम हॅचबॅक डिझाइनला नव्‍या उंचीवर नेले आहे. या वेईकलच्‍या आकर्षक पुढील बाजूस लक्षवेधक ३डी ग्रिल, ल्‍यूमिनेट एलईडी हेडलॅम्‍प्‍स आणि सिग्‍नेचर इन्फिनिटी एलईडी कनेक्‍टेड टेल लॅम्‍प्‍स आहेत, ज्‍यामुळे वेईकल रस्‍त्‍यावर सर्वांचे लक्ष वेधून घेते. कूप-सारख्‍या सिल्‍हूटमध्‍ये फ्लोटिंग रूफ, शिल्‍पाकृती बॉडी लाइन्‍स आकर्षक डोअर हँडल्‍स आणि ड्रॅग-कट अलॉई व्‍हील्‍ससह अधिक आकर्षकतेची भर करण्‍यात आली आहे, ज्‍यामुळे स्‍टाइल व ऐरोडायनॅमिक्‍समध्‍ये वाढ झाली आहे. आतील बाजूस, केबिनच्‍या सुधारणेमधून नवीन बेंचमार्क दिसून येतो. ग्रँड प्रीस्टिजिया डॅशबोर्डसह सॉफ्ट-टच पृष्‍ठभाग, गॅलॅक्‍सी अॅम्बियण्‍ट लायटिंग आणि प्रीमियम ड्युअल-टोन बीज इंटीरिअर्स अत्‍याधुनिक टोन स्‍थापित करतात. एक्झिक्‍युटिव्‍ह लाऊंड-प्रेरित रिअर सीटिंगसह विस्‍तारित थाय सपोर्ट, फ्लॅट फ्लोअर आणि व्‍यापक ९०-अंश डोअर ओपनिंग्‍ज प्रभावी आरामदायीपणाची खात्री देतात, ज्‍यामुळे प्रत्‍येक प्रवास अत्‍यंत विशेष वाटतो.

तंत्रज्ञानामध्‍ये फिल स्‍पेशलचा अनुभव घ्‍या - प्रीमियम केबिन अनुभव

नवीन अल्‍ट्रोजची खासियत म्‍हणजे विभागातील सर्वोत्तम डिजिटल अनुभव. हार्मनच्‍या १०.२५ इंच अल्‍ट्रा व्‍ह्यू इन्‍फोटेन्‍मेंट सिस्‍टमसोबत फुल-डिजिटल एचडी १०.२५ इंच क्‍लस्‍टरसह रिअल-टाइम नेव्हिगेशन व्‍ह्यू आहे.

इतर वैशिष्‍ट्ये पुढीलप्रमाणे : 

• ३६०० सराऊंड व्‍ह्यू कॅमेरासह ब्‍लाइण्‍ड व्‍ह्यू मॉनिटर • वॉईस-एनेबल इलेक्ट्रिक सनरूफ • वायरलेस अँड्रॉइड ऑटो व अॅप्‍पल कारप्‍ले• वायरलेस चार्जिंग आणि ड्युअल ६५ वॅट टाइप सी फास्‍ट चार्जर्स • एअर प्‍युरिफायर आणि भारतातील उन्‍हाळ्यासाठी एक्‍स्‍प्रेस कूलिंग • आयआरए कनेक्‍टेड वेईकल टेक्‍नॉलॉजीसह ५० हून अधिक वैशिष्‍ट्ये  

गतीमध्‍ये फिल स्‍पेशलचा अनुभव घ्‍या - प्रत्‍येक जीवनशैलीसाठी पॉवरट्रेन पर्याय 

ऑल-न्‍यू अल्‍ट्रोज पेट्रोल, डिझेल, सीएनजी या पॉवरट्रेन्‍सच्‍या सर्वसमावेशक श्रेणीमध्‍ये, तसेच डीसीए व एएमटी ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशन्‍समध्‍ये ऑफर करण्‍यात आलेली भारतातील एकमेव प्रीमियम हॅचबॅक आहे. यामधून शहरातील प्रभावी प्रवासासाठी उत्‍साहवर्धक ड्राइव्‍ह अनुभवाची खात्री मिळते. 

• १.२ लिटर रेवोट्रॉन पेट्रोल (मॅन्‍युअल, डीसीए व नवीन एएमटी) - सुधारित ड्रायव्हिंगक्षमतेसह वैविध्‍यपूर्ण ट्रान्‍समिशन पर्याय o १.२ लिटर आयसीएनजीसह ट्विन-सिलिंडर टेक - भारतातील सर्वात प्रगत सीएनजी सिस्‍टमसह एैसपैस बूट स्‍पेस आणि प्रीमियम वैशिष्‍ट्ये 

• १.५ लिटर रेवोटॉर्क डिझेल - भारतातील एकमेव डिझेल हॅचबॅक, जी उच्‍च टॉर्क आणि महामार्गावर प्रभावी क्रूझिंग देते. 

सोयीसुविधा, कार्यक्षमता किंवा रोमांचपूर्ण ड्रायव्हिंगचा आनंद घ्‍यायचा असो अल्‍ट्रोज सर्वकाही देते, ज्‍यामुळे अस्‍सल सेगमेंट लीडर आहे. 

प्रत्‍येक वळणावर सुरक्षिततेसह फिल स्‍पेशलचा अनुभव घ्‍या 

विश्‍वसनीय अल्‍फा आर्किटेक्‍चरवर निर्माण करण्‍यात आलेल्‍या अल्‍ट्रोजने भारतातील सर्वात सुरक्षित प्रीमियम हॅचबॅक असण्‍याचा वारसा कायम ठेवला आहे. सुरक्षितता वैशिष्‍ट्ये पुढीलप्रमाणे -

• ६ एअरबॅग्‍ज आणि प्रमाणित म्‍हणून ईएसपी • डायमंड स्‍ट्रेन्‍थ सेफ्टी शील्‍ड - सुधारित रचनात्‍मक प्रबळतेसह सुधारित क्रम्‍पल झोन्‍स • एसओएस कॉलिंग फंक्‍शन (ई-कॉल/बी-कॉल) • ISOFIX माऊंट्स, हिल होल्‍ड असिस्‍ट, एलईडी फॉग लॅम्‍प्‍ससह कॉर्नरिंग आणि इतर अनेक

ऑल-न्‍यू अल्‍ट्रोज आकर्षक डिझाइन परिवर्तन, आकर्षक इंटीरिअर्स आणि अत्‍याधुनिक तंत्रज्ञानासह वारसाला नव्‍या उंचीवर घेऊन जाते, तसेच अत्‍याधुनिकता, वैविध्‍यता, एैसपैस जागा आणि प्रीमियम वैशिष्‍ट्ये देते. तरूण, आधुनिक व महत्त्वाकांक्षी ड्रायव्‍हर्ससाठी विचारपूर्वक डिझाइन करण्‍यात आलेली ऑल न्‍यू अल्‍ट्रोज प्रत्‍येक वळणावर प्रभावित करते. याव्‍यतिरिक्‍त, मल्‍टी-फ्यूएल पॉवरट्रेन पर्याय कार्यक्षमता व रोमांचचे परिपूर्ण संतुलन देते, ज्‍यामुळे ही वेईकल खरीखुरी सेगमेंट लीडर आहे. 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI