TATA EV : टाटा मोटर्सच्या दोन बहुचर्चित कार आता राष्ट्रपती भवनाच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. भारतात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.  टाटा मोटर्सने आपल्या दोन लोकप्रिय इलेक्ट्रिक कार कर्व्ह (Curvv EV) आणि टियागो ईव्ही हे राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे पाठवल्या आहेत. देशातील सर्वात मोठ्या राष्ट्रपती भवानानेही आता EV तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. यामुळे मेक इन इंडिया उपक्रमासही बळ मिळत  आहे. या दोन्ही गाड्यांचे काय वैशिष्ट्य आहे आणि डिलिव्हरी का महत्त्वाची आहे हे जाणून घेऊया. 

 टाटा ईव्हीनुसार, या गाड्यांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक मेक इन इंडिया पार्ट्स आणि तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. म्हणूनच ते खरेदी धोरणानुसार श्रेणी 1 पुरवठादार या वर्गात येतात. 

टाटा कर्व्ह ईव्ही डार्क एडिशन (Tata Curvv EV Price - Features)

टाटा कर्व्ह ईव्हीच्या नवीन डार्क एडिशनची एक्स-शोरूम किंमत 22.24 लाख रुपये आहे. ही कार कर्व्ह ईव्हीच्या टॉप-स्पेक वेरिएंट Empowered+ A ट्रिमवर आधारित आहे, ज्यामध्ये 55 kWh चे बॅटरी पॅक आहे. टाटाची ही कार तिच्या स्टँडर्ड मॉडेलपेक्षा 25 हजार रुपये महाग आहे.

टाटा कर्व्ह ईव्हीमध्ये फ्रंट-व्हील-ड्राइव्ह (FWD) मोटर लावली आहे, ज्यामुळे 167 hp पॉवर मिळते आणि 215 Nm टॉर्क जनरेट होते. या इलेक्ट्रिक कारमध्ये मिळणाऱ्या 55 kWh च्या बॅटरी पॅकसह कर्व्ह एका चार्जिंगमध्ये 502 किलोमीटरची रेंज देण्याचा दावा करते.

टाटा टियागो ईव्ही (Tata Tiago EV Price)

टाटा टियागो ईव्हीची एक्स-शोरूम किंमत 7.99 लाख रुपयांपासून सुरू होऊन 11.49 लाख रुपयांपर्यंत जाते. ही कार दोन वेरिएंटमध्ये येते. त्याच्या बेस मॉडेलमध्ये फुल चार्जवर 250 किमीची रेंज मिळते, तर टॉप वेरिएंटमध्ये ही रेंज 315 किमीपर्यंत जाते. टियागो ईव्हीच्या टॉप वेरिएंटमध्ये 24kWh ची बॅटरी मिळते. जर तुम्ही ती महिन्याला 1500 किलोमीटर (रोज सरासरी 50 किलोमीटर) चालवता, तर एका महिन्याचा खर्च 2,145 रुपये असेल. वर्षभर 20,000 किलोमीटर चालवल्यास हा खर्च 28,000 रुपये असेल.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI