Indian Army: महिंद्रा अँड महिंद्राची (Mahindra And Mahindra) स्कॉर्पिओ एसयूवी लवकर भारतीय सेनेच्या ताफ्यात सहभागी होणार आहे. महिंद्रा अॅन्ड महिंद्राने भारतीय सेनेला स्कॉर्पिओ एसयूवीच्या 1470 गाड्यांची ऑर्डर दिली आगे. महिंद्र कंपनीने ऑफिशिअल ट्विट करत कंपनीला गाड्यांची ऑर्डर दिल्याची माहिती दिली आहे. भारतीय सेनेच्या ताफ्यात स्कॉर्पियो क्लासिक मॉडेलच्या जुन्या मॉडेलची ऑर्डर देण्यात आली आहे.
कशी असणार आर्मी स्पेक स्कॉर्पिओ?
महिंद्राने ट्विट केलेल्या फोटोमध्ये, ओल्ड स्कॉर्पिओ दिसत आहे. गाडीचा लूक, अलॉय व्हीलचे जुने डिझाइन आणि महिंद्राच्या जुन्या लोगोवरून स्पष्ट होते, आर्मी स्पेक मॉडेलला 4WD तंत्रज्ञान आणि टो हिच देखील दिलेली पाहायला मिळते. आर्मी स्पेक स्कॉर्पिओमध्ये विंडशिल्डच्या वरती दोन्ही बाजूंना व्हर्टिकल टेल लाईटच्यावर प्लास्टिक पॅनल दिले आहे. आर्मी स्पेक महिंद्रा स्कॉर्पिओच्या इंटेरिअरमध्ये ग्रे आणि काळ्या रंगाचे इंटेरिअर आणि एक टचस्क्रीम इंफोटेनमेन्टसह क्लायेट कंट्रोल दिला आहे. तसेच या गाडीमध्ये अनेक सुविधा देण्याची शक्यता आहे. परंतु अद्याप याविषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही.
पॉवरट्रेन
ताफ्यात सामील होणाऱ्या स्कॉर्पिओचे मॉडेल जुने असल्याने यामध्ये 2.2 लीटर डिझेल इंजिन आहे. जे 140 HP पॉवर जनरेट करेल. हे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह कनेक्ट आहे. नव्या स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये 2.2 लीटर डिझेल इंजिन आहे. जे 130 HP जनरेट करते.
Maruti Suzuki Gypsy चा समावेश
भारतीय सेनेत सध्या Tata Xenon पिक अप, Tata Safari Storme आणि Maruti Suzuki Gypsy वापरण्यात येते. मारूती जिप्सी खास सेनेतील अधिकारी पसंद करतात. मे 2018 मध्ये Tata Motors ने आर्मी-स्पेक थ्री-डोर सफारी स्टॉर्म सॉफ्ट टॉप सादर केली होती. परंतु भारतीय सैन्यात या गाडीचा समावेश करण्यात आलेला नाही.
इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य
मार्च 2022 ला जारी केलेल्या एका रिपोर्टमध्ये म्हटले होते की, भारतीय सेन हळूहळू जिप्सी रिप्लेस करण्याच्या विचारात आहे. यामध्ये स्कॉर्पिओचा देखील समावेश आहे. कारण आता भारतीय सैन्य इलेक्ट्रिक वाहनांना आपल्या ताफ्यात सहभागी करण्याच्या विचारात आहे. काही दिवसापूर्वी हवाई दलाने आपल्या ताफ्यात 12 नेक्सॉन ईव्हीचा समावेश केला आहे.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI