Ratan Tata Celebrates 25 Years Of Tata Indica Car: देशाच्या वाहन क्षेत्रात काळानुरूप सातत्याने बदल होत आहेत. आज आपण रस्त्यांवर अॅडव्हान्स फीचर्सने सुसज्ज असलेल्या एकापेक्षा एक अशा जबरदस्त कार पाहत आहोत. मात्र देशाच्या वाहन बाजारपेठेला इथपर्यंत पोहोचण्यात अनेक मोठे संकल्प आणि चिकाटी महत्त्वाची ठरली आहे. नव्वदच्या दशकात टाटा मोटर्सने आपली परवडणारी हॅचबॅक टाटा इंडिका (Tata indica) ही देशातील पहिली डिझेल कार म्हणून लॉन्च केली होती. आज याच कारला भारतात लॉन्च होऊ 25 वर्ष पूर्ण झाले आहेत. अशातच उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) यांनीही टाटा इंडिका लॉन्चच्या दिवसांची आठवण करून देणारा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
रतन टाटा (Ratan Tata) यांनी आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, 25 वर्षांपूर्वी टाटा इंडिकाने भारतात स्वदेशी प्रवासी कार उद्योगाला जन्म दिला. टाटा इंडिका (Tata indica) 1998 मध्ये लॉन्च झाली होती. डिझेल इंजिनवर चालणारी ही पहिली भारतीय हॅचबॅक कार होती. याने भारतीयांच्या हृदयात असे स्थान निर्माण केले की, आजही ते लोकांच्या लक्षात आहे. भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारमध्येही टाटा इंडिकाला स्थान मिळाले आहे.
या पोस्टसह त्यांनी एक फोटो देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये रतन टाटा (Ratan Tata) हे टाटा इंडिका (Tata indica) शेजारी उभे असल्याचे दिसत आहे. हा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, टाटा इंडिका लॉन्च करणे हे भारताच्या स्वदेशी प्रवासी कार उद्योगाचा जन्म होता. या आनंदाच्या आठवणी आहेत आणि माझ्या हृदयात या आठवणींना विशेष स्थान आहे. रतन टाटा (Ratan Tata) यांनी ही पोस्ट शेअर केल्यापासून आतापर्यंत 37 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत आणि ही संख्या सातत्याने वाढत आहे.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI