Honda Activa Scooter: प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी Honda ची Activa भारतात सर्वाधिक पसंत केली जाणारी स्कूटर आहे. या स्कूटरला भारतात मोठी मागणी असून याची विक्रीही सर्वाधिक होते. अशातच होंडा या दिवाळीत आपल्या Activa स्कूटरच्या खरेदीवर ग्राहकांना मोठी सूट देत आहे. तुम्ही ही स्कूटर फायनान्स प्लॅन अंतर्गत देखील खरेदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती.


Honda Activa Discount offer


दिवाळीत Honda Motors आपल्या ग्राहकांना Activa स्कूटरवर 5% सूट देत आहे. म्हणजेच ग्राहकांना 5,000 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. ही ऑफर 31 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. ग्राहक Honda Activa या ऑफर डिस्काउंट तसेच स्पेशल फायनान्स प्लॅन अंतर्गत खरेदी करू शकता. या ऑफर अंतर्गत तुम्ही ही स्कूटर झिरो डाउन पेमेंटवर आणि नो कोस्ट EMI वर खरेदी करू शकता. परंतु या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आणि ईएमआय करण्यासाठी बँक ऑफ बडोदा, आयडीएफसी फर्स्ट बँक, स्टँडर्ड चार्टर्ड, वन कार्ड आणि फेडरल बँकेचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड असणे आवश्यक आहे.


Honda Activa Price


Honda Activa 100cc इंजिन असलेल्या बेस व्हेरिएंटची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 73,086 रुपये आहे. तर याचे टॉप मॉडेल 76,587 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच त्याचे 125 सीसी इंजिन व्हेरिएंट 77,062 रुपयांच्या प्रारंभिक एक्स-शोरूम किंमतीवर उपलब्ध आहे आणि त्याचे स्टॅंडर्ड मॉडेल 84,235 रुपयांना उपलब्ध आहे.


Honda Activa 6G Engine 


Honda Activa 6G मध्ये 109.51 cc फ्युएल-इंजेक्टेड, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. जे 7.79 PS पॉवर आणि 8.84 Nm टॉर्क जनरेट करते. या इंजिनसाठी स्कूटरला ACG स्टार्टर आणि इंजिन किल स्विच देखील मिळतो.


Honda Activa 125 Engine


Activa 125 स्कूटरमध्ये 123.9 cc फ्युएल इंजेक्टेड, सिंगल सिलेंडर इंजिन आहे. जे 8.29 PS पॉवर आणि 10.3 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनला स्टार्ट स्टॉप सिस्टम आणि सायलेंट स्टार्टिंग फीचर देखील मिळते. यासोबतच यामध्ये एससीजी स्टार्टर जनरेटरही उपलब्ध आहे.


इतर महत्वाची बातमी: 


Tata Discount Offers : 'या' टाटा कारवर मिळतेय भरघोस सूट; तुम्हीही कार घेण्याचा विचार करत असाल तर ही संधी सोडू नका


Car loan Information:

Calculate Car Loan EMI