Smriti Mandhana: भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हिने नवीन लँड रोव्हर रेंज रोव्हर इव्होक (Range Rover Evoque) कार खरेदी केली आहे. या कारची प्रारंभिक किंमत 72.09 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. स्मृतीने सिलिकॉन सिल्व्हर शेडमध्ये रेंज रोव्हर इव्होकचे टॉप व्हेरिएंट खरेदी केले आहे. ही कार फक्त दिसायला चांगली नाही तर हिचे इंजिन दमदार आणि फीचर्स आधुनिक आहेत.


ही SUV पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. जी माईल्ड-हायब्रीड तंत्रज्ञानासह येते. एका इंस्टाग्राम युजसरने स्मृतीचा एक फोटो पोस्ट केला आहे, जो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती तिच्या रेंज रोव्हर इव्होकसोबत दिसत आहे. ही रेंज रोव्हर 2020 मध्ये अपडेट केली गेली होती. रेंज रोव्हर इव्होक आर-डायनॅमिक एसई व्हर्जनमध्ये सादर करण्यात आली होती. मानधना हिच्या मालकीची रेंज रोव्हर इव्होक नवीन लोखंडी ग्रील, एलईडी डीआरएल, फ्लश डोअर हँडल आणि नवीन अलॉय व्हील्सने सुसज्ज आहे.


रेंज रोव्हर इव्होकचे आतील भाग 3D सराउंड कॅमेरा, PM 2.5 फिल्टरसह केबिन एअर आयनीकरणाने सुसज्ज आहेत. यात नवीन Piwi Pro इंफोटेनमेंट सिस्टम आणि फोन सिग्नल बूस्टरसह वायरलेस चार्जिंग सारखे फीचर्स देण्यात आले आहे. लँड रेंज रोव्हर इव्होकच्या सेफ्टी फीचर्सबद्दल सांगायचे तर, यात ऑटोमॅटिक अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टम, stability control, फ्रंट एअरबॅग, साइड एअरबॅग, ओव्हरहेड एअरबॅग मिळतात. असं असलं तरी हे तेच मॉडेल आहे जे कंपनीने फेब्रुवारी 2022 मध्ये खराब एअरबॅग लाइटमुळे परत मागवले होते.


याच्या केबिनला आबनूस आणि डीप गार्नेट रंगांसह ड्युअल-टोन रंग मिळतो. रेंज रोव्हर इव्होक 2.0-लिटर इंजेनियम पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे. जे 247 Bhp आणि 365 Nm टॉर्क जनरेट करू शकते. दुसरा इंजिन पर्याय म्हणजे 2.0-लिटर इंजेनियम डिझेल इंजिन, जे 201 Bhp पॉवर आणि 430 Nm टॉर्क निर्माण करते. 9-स्पीड स्वयंचलित ट्रांसमिशनसह सुसज्ज. याच्या दुसऱ्या इंजिन पर्यायात 2.0-लिटर इंजेनियम डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे 201 Bhp पॉवर आणि 430 Nm टॉर्क जनरेट करते.  हे इंजिन 9-स्पीड स्वयंचलित ट्रांसमिशनसह सुसज्ज आहे.


रेंज रोव्हर इव्होक व्यतरिक्त स्मृती मानधना हिच्याकडे मारुती सुझुकी डिझायर आणि ह्युंदाई क्रेटा एसयूव्ही देखील आहेत. अलीकडच्या काळात, हरमनप्रीत कौर आणि मिताली राज सारख्या क्रिकेटपटूंना मागे टाकून सप्टेंबर 2022 मध्ये ODI क्रिकेटमध्ये 3,000 धावा करणारी ती तिसरी भारतीय उपकर्णधार ठरली आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI