Ola MoveOS 3 Features: इलेक्ट्रिक दुचाकी सेगमेंटमध्ये आपला दबदबा निर्माण केलेल्या ओलाने शनिवारी आपली Ola S1 Air स्कूटर लॉन्च केली आहे. ही आतापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत 79,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ही स्कूटर MoveOS 3 सॉफ्टवेअरसह लॉन्च करण्यात आली आहे. लवकरच हे सॉफ्टवेअर अपडेट कंपनीच्या इतर दोन स्कूटर्स Ola S1 आणि Ola S1 Pro साठी देखील जारी केले जाईल. स्कूटरवर हे अपडेट इन्स्टॉल करणे मोबाइल सॉफ्टवेअर अपडेट करण्याइतके सोपे आहे. या OS अपडेटमध्ये नवीन युजर्सला काय मिळणार हे जाणून घेऊ.
MoveOS 3 सॉफ्टवेअर अपग्रेड पार्टी मोड, मूड, प्रॉक्सिमिटी अनलॉक यासह Ola च्या हायपरचार्जर नेटवर्कशी सुसंगतता यासह 20 हून अधिक नवीन फीचर्स मिळणार आहे. पार्टी मोड फीचरमध्ये ब्लूटूथद्वारे गाणे प्ले करताना, स्कूटरचे दिवे देखील त्यानुसार ऍडजस्ट होतील. या अपडेटमध्ये उपलब्ध आणखी एक उत्तम फीचर म्हणजे 'प्रॉक्सिमिटी अनलॉक', या फीचरमुळे आता स्कूटर मॅन्युअली लॉक किंवा अनलॉक करण्याची गरज भासणार नाही. या अपडेटनंतर तुम्ही स्कूटरच्या जवळ येतातच ती ऑटोमॅटिक अनलॉक होईल. ओलाने याला 'वर्ल्ड फर्स्ट' फीचर म्हटले असून कंपनीने या तंत्रज्ञानाचे पेटंट घेतले आहे. पण Honda, Ducati आणि Triumph च्या काही प्रीमियम बाईक्समध्ये कीलेस एंट्री सिस्टम आधीपासूनच उपलब्ध आहे.
वाढणार चार्जिंग स्पीड
MoovOS 3 अपडेटनंतर स्कूटरला व्हेकेशन मोड देखील मिळेल. ज्यामुळे स्कूटरची पॉवर वाचेल. यामुळे स्कूटर 200 दिवस चार्ज ठेवता येते. यासोबतच यात हायपरचार्जिंगचे मोठे अपडेटही दिसणार आहे. याच्या मदतीने स्कूटर फक्त एक मिनिट चार्ज करून 3 किलोमीटर चालवता येते. तसेच केवळ 15 मिनिटे चार्ज करून 50 किमी पर्यंत चालवता येते.
दरम्यान, अलीकडेच Okaya EV ने भारतात आपले दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केले आहे. ओकाया फास्ट एफ 2 बी आणि ओकाया फास्ट एफ 2 असे या दोन इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव आहेत. याची रेंज 85 किमीपर्यंत असल्याचा दावा करण्यात आला आहे. भारतीय बाजारपेठेत F2B ची किंमत 89,999 रुपये आणि F2T ची किंमत 84,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
इतर महत्वाची बातमी:
Okaya Electric Scooter: ओकायाने लॉन्च केले 2 नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किंमत आणि रेंज
Car loan Information:
Calculate Car Loan EMI