Best Electric Bikes : भारतात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वेगाने वाढत आहे. डिझेल आणि पेट्रोल वाहनांच्या तुलनेत त्यांना चालवण्याचा खर्चही खूप कमी आहे. इलेक्ट्रिक कार आणि इलेक्ट्रिक स्कूटर लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहेत. कदाचित याच कारणामुळे वाहन उत्पादक आता इलेक्ट्रिक बाईक्स लाँच करत आहेत. सध्या भारतात उपलब्ध असलेल्या बजेटमध्ये बसणाऱ्या हाय रेंज इलेक्ट्रिक बाईक्स बद्दल माहिती घेऊयात. 


ग्रॅव्हटन क्वांटा (Gravton Quanta)


Gravton Quanta ही बाईक ब्लूटूथच्या माध्यमातून स्मार्ट अॅप्लिकेशनशी कनेक्ट होऊ शकते. सिंगल चार्जिंगमध्ये 150 किमीची रेंज देऊ शकते. बाईक फक्त 4.5 सेकंदात 45 किमी प्रतितास वेग वाढवू शकते. बाईकची टॉप स्पीड 70 किमी आहे. बाईकच्या अॅपद्वारे बाईकची रेंज, चार्ज स्टेटस, लोकेशन मॅपिंग, जवळचे चार्जिंग स्टेशन इत्यादींची माहिती पाहता येते. 99,000 रुपये (एक्स-शोरूम) किंमतीवर बाईक लाँच करण्यात आली आहे.


कबीरा केएम 400 (Kabira KM400)


Kabira KM400 बाईक त्याच्या दोन राईडिंग मोडच्या मदतीने 150 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. स्पोर्ट मोडमध्ये बाईक 90 किमी पर्यंत धावू शकते. बाईकमध्ये 4kWh क्षमतेचा बॅटरी पॅक आणि 6kWh क्षमतेची BLDC इलेक्ट्रिक मोटर बसवण्यात आली आहे. बाईकची टॉप स्पीड 120 किलोमीटर प्रति तास आहे. बाईक फक्त 3.3 सेकंदात 40 किलोमीटर प्रतितास वेगाने धावते.


रिवोल्ट आरव्ही 400 (Revolt RV400)


Revolt RV400 बाईक एकाच चार्जवर सुमारे 150 किलोमीटरची रेंज देण्यास सक्षम आहे. बाईकमध्ये 24Kwh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 85 किमी प्रतितास वेगाने धावण्यास सक्षम आहे. इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स अशा तीन रायडिंग मोडमध्ये बाईक उपलब्ध आहे. यात MyRevolt मोबाईल अॅप कनेक्टिव्हिटी, जिओफेन्सिंग, कस्टमाईज्ड एक्झॉस्ट साउंड, बॅटरी स्टेटस, एलईडी हेडलॅम्प, एलईडी टेललाइट्स आणि पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. ही बाईक दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई, अहमदाबाद आणि हैदराबाद या सहा शहरांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. बाईकची किंमत सुमारे 1 लाख रुपये आहे.


अॅटम 1.0 (Atum 1.0)


Atum 1.0 ही इलेक्ट्रिक बाईक फक्त 4 तासात पूर्ण चार्ज होते. पूर्ण चार्जवर बाईक 100 किमी ड्रायव्हिंग रेंज देते. बॅटरीची 2 वर्षांची गॅरंटी कंपनीकडून मिळते. या बाईकची किंमत 50 हजार रुपये आहे.