Sony Electric Car: इलेक्ट्रॉनिक उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेली कंपनी सोनी (Sony Electric Car) आता इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीने अलीकडेच आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारबाबत माहिती उघड केली आहे. कंपनी 4 जानेवारीपासून लास वेगास, यूएसए येथे होणार्‍या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शो (CES 2023) मध्ये ही कार लोकांसमोर सादर करणार आहे. सोनी ही इलेक्ट्रिक कार (Sony Electric Car) जपानी कार निर्माता कंपनी Honda सोबत संयुक्त उपक्रमात विकसित करत आहे. एका रिपोर्ट्सनुसार, कंपनी 2026 मध्ये या कारचे उत्पादन सुरू करेल. ही कार सुरुवातीला युरोप आणि अमेरिकन मार्केटसाठी लॉन्च करणार. अनेक ग्राहक सोनीच्या या नवीन इलेक्ट्रिक कारची प्रतीक्षा करत आहे. कंपनी यामध्ये अनेक आधुनिक फीचर्स देऊ शकते. यामधले सर्वात मोठे फीचर म्हणजे ही कार ड्रायव्हरशिवाय रस्त्याव धावू शकते. ही कार जागतिक बाजारात लॉन्च झाल्यावर याची टक्कर टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारशी होऊ शकते. कशी असणार आहे ही कार? यामध्ये काय असेल खास? तसेच यात कोणते फीचर्स मिळू शकतात, हे जाणून घेऊ... 


Sony Honda Mobility to unveil their first EV at CES 2023 : फीचर्स 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनीची इलेक्ट्रिक कार (Sony Electric Car) लेव्हल-3 ऑटोनॉमस ड्रायव्हिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. या तंत्रज्ञानाच्या मदतीने कार स्वतः चालवण्यास सक्षम होते. यासाठी कारमध्ये अनेक ठिकाणी कॅमेरे बसवले आहेत. कारची आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence in the Automotive Industry) कारला कारच्या आजूबाजूची परिस्थिती समजून घेऊन कशी व कोणत्या दिशेने धावायचं हे सांगते. या इलेक्ट्रिक कारची (Sony Electric Car) इन्फोटेनमेंट सिस्टम सोनी प्लेस्टेशन 5 च्या फुल व्हर्जनमध्ये बदलली जाऊ शकते. म्हणजेच तुम्ही याच्या आत बसून व्हिडीओ गेमही खेळू शकता.


Sony Honda Mobility to unveil their first EV at CES 2023 : सोनीची इलेक्ट्रिक कार (Sony Electric Car) असेल लक्झरी 


मिळालेल्या माहितीनुसार, सोनी होंडा मोबिलिटीची (Sony Honda Mobility) ही इलेक्ट्रिक कार लक्झरी सेगमेंटमध्ये लॉन्च केली जाऊ शकते. म्हणजेच ही इलेक्ट्रिक कार सर्वसामान्यांच्या बजेटच्या बाहेर असेल. सोनी होंडा मोबिलिटीने (Sony Honda Mobility)  2025 च्या मध्यात तिची बुकिंग सुरू करण्याची घोषणा केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या 2022 CES मध्ये Sony ने आपली कार Vision S-02 चे अनावरण केले होते.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI