Shikhar Dhawan Car Collection: भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंप्रमाणे शिखर धवनलाही (Shikhar Dhawan Viral Photo) महागड्या आणि आलिशान कारचा शौक आहे. त्याने गेल्या वर्षी त्याच्या कार कलेक्शनमध्ये नवीन BMW M8 Coupe चा समावेश केला आहे. अलीकडेच शिखर धवनने (Shikhar Dhawan Viral Photo) सोशल मीडियावर कारसह त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. शिखरने हे फोटो त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाईल shikhardofficial वर शेअर केले आहेत. गेल्या वर्षी शिखर धवनने (Shikhar Dhawan) BMW M8 Coupe ची डिलिव्हरी घेतली तेव्हा BMW ने ट्विटरवर त्याचे फोटो शेअर केले होते. BMW M8 ही भारतातील कंपनीकडून विकली जाणारी सर्वात पॉवरफुल कार आहे.


BMW M8 Coupe ही BMW 8 सिरीज ग्रॅन कूपची परफॉर्मन्स ओरिएंटेड व्हर्जन आहे. BMW ने 2020 मध्ये M8 अधिकृतपणे भारतात लॉन्च केली होती. शिखर धवनने (Shikhar Dhawan Viral Photo) ही कार मेटॅलिक ब्लॅक शेडमध्ये खरेदी केली आहे, जी कारवर छान दिसते. धवनने इंस्टाग्रामवर नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंवरून असे दिसते आहे की, त्याने त्यात कोणताही बदल केलेला नाही. या फोटोंमध्ये M8 Coupe च्या आतील भागाचीही झलक दिसते. रिमलेस विंडो याला स्पोर्टी लूक देतात आणि लाल रंगाचे इंटीरियर या कारला अधिक आकर्षक बनवतात. 


डॅशबोर्डचा खालचा भाग आणि सीट्स आणि दरवाजाचे पॅड लाल रंगात फिनिशिंगसह दिसत आहे. शिखर धवनने (Shikhar Dhawan Viral Photo) शेअर केलेल्या दोन फोटोंमध्ये, एकामध्ये तो कारच्या बाहेर उभा आहे आणि दुसऱ्यामध्ये तो ड्रायव्हरच्या सीटवर दिसत आहे. परफॉर्मन्स कार सेगमेंटमध्ये BMW M8 ची ऑडी RS स्पोर्टबॅक, मर्सिडीज-बेंझ AMG GT 63 बरोबर स्पर्धा होते. सामान्य BMW प्रमाणे M8 ला देखील समोरील बाजूस सिग्नेचर किडनी ग्रिल मिळते.






BMW M8 Coupe Price in India: इंजिन आणि किंमत 


BMW M8 Coupe मध्ये 10.25-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, मेरिनो लेदर अपहोल्स्ट्री, हरमनची साउंड सिस्टम, M स्पोर्ट्स सीट्स, अॅम्बियंट लाइटिंग, पार्क असिस्ट प्लस, 12.3-इंचाचे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जिंग, BMW डिस्प्ले सारखे फीचर्स आहेत. BMW M8 ला 4.4-लीटर, ट्विन-टर्बो V8 इंजिन मिळते. हे इंजिन 592 bhp आणि 750 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे 8-स्पीड स्टेपट्रॉनिक ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे आणि M-spec xDrive AWD प्रणाली वापरून सर्व चाकांना वीज पाठवते. याची एक्स-शोरूम किंमत 2 कोटी रुपये इतकी आहे. 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI