The Hybrid Car : बदलत्या विज्ञान तंत्रज्ञानासह राहणीमानातही बदल होतोय. तसेच लोकांच्या गरजा आणि अपेक्षा देखील वाढतायत. ग्राहकांना नेहमी आकर्षित करण्याच्या प्रयत्नातून अनेक कार कंपन्या नवीन अविष्कार घेऊन येत आहेत. यामध्ये एक विकास असाही केला आहे ज्यामध्ये कारचे विमानात रूपांतर करण्यात आले आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटलं असेल, पण हे खरं आहे. स्लोव्हाकिया या मध्य युरोपातील देशात या कारची उड्डाण चाचणी पूर्ण करण्यात आलेली आहे.


CNN ने दिलेल्या माहितीनुसार, 70 तासांची कठोर उड्डाण चाचणी पूर्ण केल्यानंतर स्लोव्हाक परिवहन प्राधिकरणाकडून कारला हवाई पात्रतेचे अधिकृत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. असे असले तरी, या एअरकारमध्ये (AirCar) उड्डाण घेण्यासाठी पायलटचा परवाना आवश्यक असणार आहे. 


Hybrid Car चे इंजिन नेमके कसे असेल? 


हायब्रीड कार-विमान BMW इंजिनसह सुसज्ज आहे आणि 2 मिनिटे आणि 15 सेकंदात स्वतःचे विमानात रूपांतर करू शकते. ही कार-विमान जास्तीत जास्त 18,000 फूट उंचीवर उडू शकते. जून 2021 मध्ये, उडणाऱ्या कारने नित्रा आणि ब्रातिस्लाव्हा विमानतळांदरम्यानचे उड्डाण अवघ्या 35 मिनिटांत पूर्ण केले. लँडिंगनंतर, क्रूने हायब्रीड वाहनाचे कारमध्ये रूपांतर केले आणि लांब प्रवास केला. असे असले तरी, कंपनीच्या डेव्हलपर क्लेन व्हिजनला एका वर्षात फ्लाइंग कार व्यावसायिकरित्या उपलब्ध होण्याची आशा आहे.


Klein Vision चे सह-संस्थापक, Anton Zajac यांच्या मते, अधिकार तज्ञांच्या टीमने डिझाइन संकल्पनांचे गणितीय मॉडेलमध्ये रूपांतर करण्यासाठी 100,000 तासांपेक्षा जास्त वेळ घालवला. हे मॉडेल नंतर प्रोटोटाइप तयार करण्यासाठी वापरले गेले. पेट्रोल पंपावर विकल्या जाणार्‍या सामान्य इंधनावर उडणारी कार धावू शकते यावरही त्यांनी प्रकाश टाकला.


पाहा व्हिडीओ : 



हा व्हिडिओ क्लेन व्हिजनने 24 जानेवारी 2022 रोजी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर पोस्ट केला होता. या व्हिडिओला अल्पावधीतच 318,950 व्ह्यूज मिळाले आहेत. क्लेन व्हिजन पॅरिस ते लंडन एअरकार उड्डाण करण्याची योजना करत आहेत.


हायब्रिड कारच्या नंतर इंतर कंपन्याही असा प्रकारच्या कार बनविण्याच्या शर्यतीत आहेत. 


PAL-V Liberty, नेदरलँड-आधारित कंपनी PAL-V ने विकसित केलेली आणखी एक हायब्रीड कार, गायरोकॉप्टरसारखी उडते आणि तिला फक्त तीन चाके आहेत. कंपनी सध्या युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी प्रमाणपत्रासाठी काम करत आहे.


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI