Skoda Slavia : भारतात लवकरच स्कोडाची (Skoda) नवी कार स्लाव्हिया (Slavia) लाँच होणार आहे. स्कोडाने पुण्यातील चाकण येथील प्लांटमध्ये स्लाव्हिया कारचे उत्पादन भारतात सुरू केले आहे. स्लाव्हिया मार्च महिन्यात लाँच होण्याची अपेक्षा आहे. स्लाव्हिया रॅपिडची जागा घेणार असून ही अधिक प्रीमियम कार आहे. सेडान (Sedan) कारला पसंती दर्शवणाऱ्या लोकांसाठी ही कार उत्तम पर्याय असणार आहे.


स्कोडाचा भारतातील सेडान कारमध्ये चांगली कामगिरी करण्याचा इतिहास आहे. यामुळं ही कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांची उत्सुकता वाढलीय. या वर्षी मार्च महिन्यात बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. या कारची प्री-बुकिंग सुरू झालीय. या कारची खासियत जाणून घेऊयात.


स्लाव्हिया कारला पहिल्यांदा पहिल्यानंतर ही कार डी-सेगमेन्टची कार दिसते. या कारला जबरदस्त लूक देण्यात आलाय. ही कार जवळपास स्कोडाच्या ऑक्टाव्हिया (Octavia) सारखीच दिसते. या कारची लांबी 4 हजार 541 एमएम इतकी आहे. तर, रुंदी 1 हजार 752 एमएम आहे. यात हेक्सागोनल क्रोम ग्रिलला नवी डिजाईन देण्यात आलीय. या कारमध्ये एलईडी डीआरएस आहे, पण बंपरच्या खालच्या भागालाही उत्तम लूक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


स्लाव्हिया कारचे टॉप-ऍण्ड व्हर्जन 16 इंच अलॉयसह येते आणि त्याच्या स्टान्सला चांगला लूक मिळालाय. कारच्या मागच्या बाजूला सी-शेपमध्ये टेल लॅम्प देण्यात आलंय. ग्राहकांना ही कार पाच रंगात खरेदी करता येणार आहे. या सेडान कारमध्ये 1.0 लीटर टीएसआय पेट्रोल आणि 1.56 लीटर सीएसआय पेट्रोल इंजन मिळतो. लहान तीन सिलेंडर असलेले पेट्रोल इंजन 113 बीपीएच पॉवर आणि 175 एनएमची टार्क जनरेट करण्यात सक्षम आहे. हे 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायांसह उपलब्ध आहे. 


शिवाय, यामध्ये मोठे 1.5-लिटर चार-सिलेंडर टर्बोचार्ज केलेले इंजिन 150 बीपीएच पॉवर आणि 250 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड सीएसजी ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायांसह उपलब्ध आहे.



संबंधित बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha


Car loan Information:

Calculate Car Loan EMI