Harley Davidson is India's Best Selling 1000cc Bike: तुम्ही 1000cc किंवा त्याहून अधिक cc ची बाईक विकत घेण्याचा विचार करत असाल, तर या सेगमेंटमध्ये कोणती बाईक सर्वोत्तम आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? जर तुमचे उत्तर नाही असेल, तर आज आम्ही तुम्हाला 1000cc सेगमेंटमधील भारतातील नंबर-1 बाईक कोणती आहे आणि त्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत. अमेरिकन मोटारसायकल उत्पादक कंपनी Harley-Davidson 1000cc सेगमेंटमध्ये भारतातील टॉप बाईक बनली आहे. रॉयल एनफिल्ड सारख्या भारतीय बाईक निर्मात्या या यादीत मागे पडल्याचं दिसत आहे. Harley Davidsons कंपनी Hero MotoCorp च्‍या भागीदारीत भारतात बाईक विकते.


भारतासह जगभरात कोविड-19 मुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले होते, तरीही या आव्हानात्मक काळातही हार्ले डेव्हिडसन बाईकच्या विक्रीने जोरदार वाढ नोंदवली आहे. हार्ले डेव्हिडसन बाईक 1000 cc आणि त्याहून अधिक पॉवरच्या बाईकच्या सेगमेंटमध्ये बाजारात आघाडीवर आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये हार्ले डेव्हिडसन मोटरसायकलचा बाजारातील हिस्सा सुमारे 37 टक्के होता. जे आर्थिक वर्ष 2021 मध्ये 27 टक्के होते. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) च्या आकडेवारीनुसार, हार्ले डेव्हिडसनने आर्थिक वर्ष 2022 मध्ये 601 युनिट्सची विक्री केली आहे. तर 2021 मध्ये 206 युनिट्सची विक्री झाली.


दरम्यान, आर्थिक वर्ष 2022 मधील विक्रीबद्दल बोलायचे तर, या काळात सर्वाधिक विक्री हार्ले डेव्हिडसन बाईकने केली आहे. हार्ले डेव्हिडसन बाईकच्या तुलनेत, ट्रायम्फ बाईकने भारतात 336 युनिट्स विकल्या आहेत. कावासाकी मोटर्सच्या एकूण 283 युनिट्सची विक्री झाली आहे. या कालावधीत सुझुकी मोटरसायकल इंडियाच्या 233 युनिट्सची विक्री झाली आहे. होंडा मोटरसायकल आणि स्कूटरने 71 युनिट्स विकल्या आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Review: नवीन फीचर्स आणि जबरदस्त लूकसह अशी आहे 'Nexon EV Max'


Tata Tiago: टाटाने आपल्या सर्वात स्वस्त कारच्या किंमतीत केली वाढ; जाणून घ्या मॉडेल आणि किंमत


Car loan Information:

Calculate Car Loan EMI