Royal Enfield Hunter 350 Launch Today : दुचाकी वाहक निर्माता कंपनी रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) आज आपली बहुप्रतिक्षीत बुलेट हंटर 350 (Hunter 350) लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या बुलेटच्या वैशिष्ट्यांबद्दल कंपनीने आधीच कल्पना दिली होती. मात्र, आज बुलेट लॉन्चच्या इव्हेंटमध्ये याची किंमत जाहीर करण्यात येणार अशी अपेक्षा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बुलेट आतापर्यंतची सर्वात स्वस्त बुलेट असणार असेही सांगण्यात येत आहे. या बुलेटची वैशिष्ट्ये जाणून घ्या. 


ही वैशिष्ट्ये असतील 


ही बुलेट मेट्रो आणि रेट्रो अशा दोन्ही व्हर्जनमध्ये पाहायला मिळेल. या बुलेटच्या मेट्रो व्हेरियंटमध्ये हाय एंड हार्डवेअर मिळेल जे त्याच्या रेट्रो व्हेरियंटपेक्षा अधिक वैशिष्ट्यांसह येईल. या व्हेरिएंटमध्ये डिस्क ब्रेक, अलॉय व्हील्स, ड्युअल-चॅनल अँटिलॉक ब्रेकिंग सिस्टम आणि दोन्ही चाकांवर एलईडी टेललाईट मिळेल. दुसरीकडे, त्याचे रेट्रो व्हेरियंट मागील बाजूस ड्रम ब्रेक, बल्ब सारखी टेललाइट, सिंगल-चॅनल अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टम आणि वायर-स्पोक व्हीलसह येईल. मेट्रो प्रकाराला ड्युअल-टोन कलर थीम मिळेल तर रेट्रो व्हेरियंटला सिंगल-टोन कलर ऑप्शन्स मिळतील. 


लूक कसा असेल? 


डिझाईननुसार पाहिल्यास, हंटर क्लासिक आणि Meteor या दोन्हीपेक्षा लांबी आणि उंचीने लहान असणार आहे. तसेच, 20.2 bhp आणि 27 Nm टॉर्कसह अपेक्षित 5-स्पीड गिअरबॉक्स देखील मिळेल. Royal Enfield Hunter 350 ही वजनाने हलकी असल्यामुळे या बुलेटकडून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.    


किंमत? 


आगामी Royal Enfield Hunter 350 बाजारात आल्यानंतर Honda CB 350 RS, TVS Ronin आणि Jawa 42 या बाईकबरोबर स्पर्धा करेल. या बुलेटची किंमत क्लासिक 350 आणि Meteor 350 च्या खाली असण्याची अपेक्षा आहे. देशात उपलब्ध असलेल्या सर्व बुलेट्सपैकी ही सर्वात स्वस्त असण्याची अपेक्षा आहे. किंमत साधारण 1.50 लाखांच्या जवळपास असण्याची शक्यता सांगितली जात आहे. 


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI