Royal Enfield : जगभरात सेमीकंडक्टर चिपची कमतरता आहे.  त्यामुळे वाहन उद्योगाला मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. सेमीकंडक्टरच्या तुटवड्याचा परिणाम रॉयल एनफिल्ड या आघाडीच्या बाइक्स कंपनीवरही दिसून येत आहे. रॉयल एनफिल्डने हिमालयन एडीव्ही आणि Meteor 350 या दोन बाइक्समधून 'ट्रिपर नेव्हिगेशन' फीचर वगळले आहे. त्याच्या परिणामी या बाइक्सच्या किंमतीत घट झाली आहे. आगामी काळात 'ट्रिपर नेव्हिगेशन' फीचर हे बाइकमधील एक पर्याय म्हणून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 


बाइकच्या किंमतीत घट


'ट्रिपर नेव्हिगेशन' फीचर वगळल्यानंतर रॉयल एनफिल्डने हिमालयन एडीव्ही आणि Meteor 350 या बाइकच्या किमतीत 5,000 रुपयांनी कपात केली आहे. ट्रिपर नेव्हिगेशन फीचर हे या दोन्ही बाइक्सचे खास फीचर होते. Royal Enfield ने क्लासिक 350 आणि Scrum 411 या बाइक्ससाठी देखील एक पर्यायी फीचर म्हणून वापरले आहे. एका वृत्तानुसार, कंपनीने आपल्या सर्व बाइक्सच्या बुकिंग दरात वाढ केली आहे. आता रॉयल एनफिल्डची बाइक बुक करण्यासाठी 20 हजार रुपये द्यावे लागणार आहेत. याआधी ही बुकिंग रक्कम 10 हजार रुपये होती. 


सेमीकंडक्टर तुटवड्याचा फटका हीरो कंपनीलाही 


हीरो इलेक्ट्रीकलादेखील सेमीकंडक्टर तुटवड्याचा फटका बसला आहे. एप्रिल महिन्यात एकही बाइक डीलर्सकडे गेली नसल्याची माहिती कंपनीने दिली. आंतरराष्ट्रीय पातळीवर अजूनही सेमीकंडक्टर तुटवडा जाणवत आहे. त्याचा परिणाम वाहन उद्योगावर होत असल्याचे कंपनीने म्हटले. वाहन उद्योगाने याआधीदेखील सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे वाहन निर्मितीवर परिणाम होत असल्याचे म्हटले होते. भारत सेमिकंटक्टर चिपसाठी आयातीवर अवलंबून आहे. कोरोना महासाथ आणि सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे सेमीकंडक्टरच्या आयातीवर परिणाम होत आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



Car loan Information:

Calculate Car Loan EMI