BMW i4 Car : BMW कार भारतीय बाजारपेठेत आणखी एक इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. बीएमडब्लूने भारतीय बाजारपेठेत i4 कार लाँच करण्याची याआधीच घोषणा केली होती. याआधी कंपनीने भारतात आपल्या EV- BMW iX आणि Mini Cooper SE लाँच केली आहे. लवकरच बाजारपेठेत येणाऱ्या BMW i4 या कारची जाणून घ्या वैशिष्ट्ये
या दिवशी होणार लाँचिंग
BMW i4 भारतात आपली इलेक्ट्रिक कार 26 मे 2022 रोजी लाँच करणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ही कार मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात लाँच झाली होती. आता येत्या काही दिवसात ही कार भारतात धावताना दिसणार आहे. BMW i4 आणि 4 सीरिज सेडान कारमध्ये समानता असल्याचे म्हटले जात आहे.
4 सीरिज सारखी दिसते i4
BMW i4 कारला BMW 4 सीरिजची इलेक्ट्रिक कार व्हर्जन म्हटले जाऊ शकते. भारतात 4 सीरिज नाही. मात्र, या र्व्हजनमध्ये इलेक्ट्रिक कार दिसणार आहे. BMW i4 ही कार 5 दरवाजे असणारी कार असणार आहे. यामध्ये पाच जण बसू शकतात. BMW i4 कारच्या समोरील भागात किडनी ग्रील असणार आहे. BMW 4 सीरिजमध्ये ही ग्रील दिसते.
स्पेसिफिकेशन
BMW i4 ही कार दोन व्हेरिएंटमध्ये असणार आहे. eDrive 40 आणि M50 या दोन व्हेरिएंटमध्ये ही कार असणार आहे. दोन्ही मॉडेल 80.7kWh फ्लोर-माउंटेड लिथियम-आयन बॅटरीसह आहे. eDrive 40 व्हेरिएंटचे मोटर 330.4bhp पॉवर आणि 430Nm पीक टॉर्क जनरेट करतात. तर, M50 या व्हेरिएंटचा मोटर 528.6bhp आणि 795Nm टार्क जनरेट करतो.
वेग
eDrive 40 कार 0 ते 100 किमी प्रतितास हा वेग अवघ्या 5.7 सेकंदात पकडू शकते. तर, M50 ही कार 3.9 सेकंदात 0-100 किमी प्रतितास इतका वेग गाठू शकते.
रेंज
BMW ने सांगितले की, i4 eDrive40 या व्हेरिएंटची कार प्रत्येक चार्जिंगवर 590 किमी इतकं अंतर कापू शकते. त्याशिवाय, कार रिजेनरेटिव्ह ब्रेकिंगसह असणार आहे. त्यामुळे रिचार्जिंगसाठी मदत होणार आहे. तर, M50 व्हेरिएंट कारची रेंज 510 किमी इतकी आहे.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI